आर्थिक विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आर्थिक विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ह्या वर्षापासून वापरायच्या सर्वांगीण विकासाच्या काही युक्त्या


• मानसिक आरोग्यासाठी युक्ती

ज्या लोकांचे आवडते विषय हे मानसशास्त्र, मानसिक आरोग्य, ध्यानावरील वैज्ञानिक संशोधन आणि मानसिक दृष्ट्या सक्षम कसे बनायचे हे असतील तर अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• शारीरिक आरोग्यासाठी युक्ती

जी लोक व्यायाम, योगा करत असतील आणि ज्यांचे विषय हे शारीरिक आरोग्य व व्यायाम ह्या बद्दल असतील अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर व्यायाम प्रशिक्षक, योग प्रशिक्षक अश्या शारीरिक आरोग्य आणि व्यायाम विषयातील तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• अध्यात्मिक आरोग्यासाठी युक्ती

जी लोक ध्यान करत असतील, अध्यात्म आणि आयुष्य ह्यावर बोलत असतील, अध्यात्मिक विकास करण्यावर भर देत असतील अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• आर्थिक विकासासाठी युक्ती

ज्या लोकांचे विषय हे पैसा, गुंतवणूक, उद्योग, व्यवसाय आणि नोकरी हे असतील अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर आर्थिक विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• कौटुंबिक विकासासाठी युक्ती

ज्या लोकांचे विषय हे कुटुंबातील वातावरण चांगले कसे रहावे, कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती कशी होणार आणि कुटुंबातील व्यक्तींचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले कसे राहणार, मुलांची प्रगती कशी होणार असे असतील तर अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• निवड कशी करायची?

आपल्या आजूबाजूला ज्या ज्या लोकांकडून जे जे सकारात्मक घेता येते ते घेणे व जिथे तुम्हाला वाटत असेल कि योग्य व्यक्ती संपर्कात नाही अश्या वेळेस तज्ञांची मदत घेणे.

तुमचे जे ध्येय आहे ते ध्येय समोरच्या व्यक्तीचे देखील असले पाहिजे किंवा त्या व्यक्तीने ते ध्येय पूर्ण केलेले पाहिजे.

• आयुष्यातील न बदलणारे नियम व अटी

नकारात्मक किंवा अयोग्य अशी एखाद दुसरी व्यक्ती जरी तुमच्या संपर्कात असेल तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही. समुद्राच्या मध्यभागी भले मोठे जहाज बुडवण्यासाठी एक छोटेसे छिद्र देखील पुरेसे आहे. 

आयुष्यात दुसरी संधी भेटत नाही, भेटतो तो अनुभव.

धन्यवाद

अश्विनीकुमार 
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण


 तुम्ही मोठ्यात मोठ्या संकटावर मात करू शकता.

तुम्ही स्वतःला पूर्णपणे विकसित करू शकता.

काहीही कायमस्वरूपी नाही आहे, तुमची आजची परिस्थिती सुद्धा.

तुम्ही अडकलेले नाही आहात.

तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.

तुम्ही नवीन सकारात्मक मानसिकता घडवू शकता.

तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकता.

तुम्ही नवीन सकारात्मक सवयी घडवू शकता.

आज ह्या क्षणी निर्णय घेणे महत्वाचे आहे, त्यानंतर तुम्ही मागे वळून बघू नका.


अश्विनीकुमार

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

योग्य दर लावूनही दीर्घकालीन उद्योग व्यवसाय करता येतो.


 एकदा एका व्यक्तीने फोन केला होता, त्याचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत होता पण काही महिन्यांपासून व्यवसाय पाहिजे तसा नफा देत नव्हता. असे का होत होते? जेव्हा त्याने सल्ला घ्यायला फोन केला तेव्हा मूळ समस्या हि समजून आली.


नवीन इंटरनेट स्वस्त झाले, त्यामध्ये विदेशी भ्रम पसरवणारे प्रोस्ताहन देणारे प्रशिक्षक आले ज्यांचा आणि उद्योग व्यवसायाचा काही संबंध नाही, त्यामध्ये शून्यातून करोडपती असे उदाहरण देत होते. म्हणजे जगात कोणी करोड च्या आत कमावणारा नकोच असे त्यांचे म्हणणे होते जे वास्तवाला धरून नव्हते.


इंग्रजी बोलणे, त्यामध्ये ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही अश्यांना न्यूनगंड, असे वाटायचे कि आपल्यातच काही कमी आहे का? जर काही हजार आणि लाखो रुपये कमावून पण मी अपयशी आहे का? माझे दर कमी आहेत का? कि मी माझी किंमत करत नाही? असे प्रश्न मनात येवू लागले व त्याचा परिणाम हा व्यवसायावर व्हायला लागला.


सर्वात अगोदर तर मी त्या व्यवसायिकाचा इंटरनेट चा वापर हा कामापुरता करायला लावला. भारतीय अर्थव्यवस्था कशी उत्तम आहे आणि बदलाची मानसिकता कशी आणि केव्हा ठेवायची हे समजावून सांगितले. त्यांचे दर योग्य का आहेत हे देखील सांगितले. आणि ह्यामुळे फिक्स ग्राहक कसे मिळतात जो पाया असेल व नंतर अल्पकालीन ग्राहक कसे मिळतात हे त्यांच्या व्यवसायातून दाखवून दिले.


जो खर्च होता तो कमी करायला लावला, जास्तीत जास्त खर्च हा खाजगी जीवनावर होता, फक्त महिन्याला इतके लाखो कमावतात म्हणून इतका खर्च करायचा असतो किंवा अशी जीवनशैली जगायची असते असे सर्व वायफळ खर्च बंद करायला लावले.


पैसा वाचायला लागला, जिथे काम कमी असेल तिथे बचत कामी यायला लागली, पाया भक्कम झाला, हळू हळू वाढ होऊ लागली, नवीन व्यवसायिकांचे आवाहने पेलता येवू लागली, योग्य दर असल्यामुळे ग्राहक काही सोडून जात नव्हते व जे कटकटीचे ग्राहक होते त्यांना सरळ नाही बोलायचे हे सांगितले, ह्यामुळे ना उधारी, ना कमी पैसे आणि ना हि नकारात्मक माउथ पब्लिसिटी झाली.


इथे जोडीदाराची साथ लागते जर ती भेटत नसेल तर कोणीही काहीही करू शकत नाही, जोडीदाराला स्पष्ट शब्दात बोलायला शिका, आयुष्य म्हणजे सिनेमा नाही. नकारात्मक जोडीदारासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे. हा काही कठीण निर्णय नाही हे लक्ष्यात ठेवा.


मुलांना अगोदरपासून योग्य संस्कार देणे गरजेचे आहे. त्यांना स्वतंत्र पण द्या सोबत लक्ष देखील ठेवा, आयुष्याचा सामना करायला लावा, सुरुवातीपासून भावनिक दृष्ट्या सक्षम बनवा, हे खाजगी सांगण्याचा उद्देश हाच आहे कि खाजगी आयुष्याचा देखील मानसिकतेवर प्रभाव पडतो.


शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पहिले महत्व द्या, ह्या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा, लाखो रुपये आजारपणावर खर्च करण्यापेक्षा काही हजार रुपये आरोग्यावर खर्च केलेले कधीही उत्तम.


आता येणाऱ्या ग्राहकांना अभिमानाने सांगतात कि ५ वर्षे झाले मी व्यवसायात आहे आणि इथेच एक स्थैर्य दिसते, ग्राहकांना विश्वास असतो कि जेव्हा गरज असेल तेव्हा ती व्यक्ती इथे असेलच म्हणून कोणीही नवीन जरी आला तरी फुकटात काही घेत नाही आणि इतरांना देखील योग्य माहिती देत सांगतात कि इथे तुम्हाला योग्य दरात चांगली सेवा मिळणार आहे. मी देखील फुकट किंवा कमी जिथे तिथे जात नाही कारण अनुभव घेतले आहे, आणि इंटरनेट रीव्ह्युव वर विश्वास नाही पण जे तिथे प्रत्यक्ष जावून अनुभव घेतले त्यांच्या सांगण्यानुसार जातो व ९९ % माहिती हि योग्यच मिळालेली असते व त्यानुसार पुढे सांगितले जाते.


ह्यामुळे व्यवसाय दुप्पट होऊ शकत होता पण केला नाही, कारण जितके झेपते तितकेच काम करायचे, विनाकारण ताण घ्यायचा नाही, कर्ज घ्यायचे नाही नाहीतर असे उद्योजक व्यवसायिक ह्यांचे फोटो भिंतीवर दिसून येतात, कारण काय तर हायपरटेन्शन, हृदयविकार चा झटका किंवा इतर आजार. हे सांगितले आहे ते वास्तव आहे. आयुष्यात जन्म मृत्यू मध्ये परत संधी भेटत नाही त्यामुळे जे आयुष्य जगत आहात ते हुशारीने जगा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


 पैसा टिकवण्यासाठी आर्थीक मानसिकता खूप महत्वाची असते. एका विद्यार्थ्याला त्याचा नवीन व्यवसाय सुरु करेपर्यंत ते स्थिर होईपर्यंत मार्गदर्शन केले. जिथे सुरुवातीला सर्व बरोबर सुरु होते पण जस जसा व्यवसाय जमू लागला तस तसा विद्यार्थी बदलला. आलेले पैसे हे साठवले नाही तर परदेशी सुट्ट्या, मुली आणि दारू ह्यावर खर्च केले. अशी वागणूक होती कि जसे ह्या पैश्यांच्या प्रवाहाचा सातत्य आहे तसाच राहणार आहे पण असे काही झाले नाही, पैश्यांचा प्रवाह तर आटलाच पण सोबत वडीलांचे आजारपण आले. पैसा जो पर्यंत तुमच्याकडे आहे तो पर्यंत तुमचा आहे, एकदा का गेला कि परत शक्यता नाही कि तुम्हाला भेटेलच म्हणून. आहे तो जपून वापरा ह्याचा अर्थ असा नाही कि घाबरून करत आहात, ह्याचा अर्थ असा आहे कि हुशारीने वापरत आहात. एक वेळ अशी येईल कि पैसा साठलेला देखील असेल, गुंतवलेला देखील व खर्च करून देखील उरत असेल. नफा तोटा व्यवसायाचा भाग आहे आणि फक्त नफा हा घोटाळा, फसवणूक आहे.

अश्विनीकुमार


 "अगोदर कुठल्याही कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर पूर्ण नफ्याचा परतावा सरळ सामान्य लोकांना मिळायचा. पण आता गुंतवणूकदार सर्व नफा आपल्याकडे घेवून उरलेला चोथा हा सामान्य लोकांसाठी ठेवतात. आणि हेच गुंतवणूकदार खराब कंपनीमध्ये गुंतवणूक करून, जो पर्यंत नफा निघत नाही तोपर्यंत तिच्या शेअर्स चे भाव वाढवून सामान्य लोकांच्या गळ्यात मारले जाते व स्वतःचा नफा काढून सेफ राहिले जाते. जेव्हा सामान्य व्यक्ती हे शेअर्स घेतो त्यानंतर शेअर्स सरळ गडगडायला सुरुवात होते. आर्थिक व्यवहारात स्वतः माहिती घ्यायला शिका."


अश्विनीकुमार

 

“उत्पादन करणे आणि विक्री करणे हे दोन्ही उद्योग व्यवसाय वेगवेगळे आहेत. जर उत्पादन क्षमता वाढवण्यावर जोर दिला असता तर महाराष्ट्र व मराठी समाज हा प्रचंड श्रीमंत झाला असता पण झाले उलटे, सर्व महत्व हे विक्री करणाऱ्यांवर देण्यात आले आणि त्यामुळे माल हा चीन वरून मागवण्यात येतो. एकप्रकारे बोलू शकतात कि दलाल श्रीमंत पण उद्योजक आणि ग्राहक त्रस्त फायदा हा चीन ला कारण विक्री करणारा हा स्वस्तात माल शोधणारच, त्यांचा व्यवसाय तर उत्तम सुरु आहे. जे भारतीय नागरिक उष्ट्या सफरचंदाचे लाखो रुपये देतात ते भारतीय उत्पादनाचे लाखो रुपये नाही देणार? बाजारात तरी उतरवा.”


अश्विनीकुमार