काँग्रेस आमदारावर मनसे पदाधिकाऱ्याची नोटांची उधळण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एकीकडे महागाई विरोधात विरोधी पक्षनेते आंदोलन करत आहे तर दुसरीकडे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदारवर मनसे पदाधिकाऱ्याचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. चांदिवली भागात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात नसीम खान यांच्यावर नोटा उधळल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. नसीम खान यांच्यावर पैसे उधळणारी व्यक्ती मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली आहेत. २०१२ साली भानुशाली यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती

मुंबईतील चांदिवली भागात हिमालय मित्र मंडळात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पैसे उडवले जात असताना नसीम खानही आनंदाने पाहत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेची झोड उठली आहे.राजकारण्यांना असे करणं शोभतं का? असा सवाल आता विचारला जात आहे.

नसीम खान यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. मी भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी स्वागत करताना पैसे उडवण्यात आले, असं नसीम खान यांचं म्हणणं आहे. आपण पैसे उडवण्यापासून रोखल्याचा दावाही नसीम खान यांनी केला आहे.

हरियाणा : सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरण : महिला पोलीस अधिकारी निलंबीत
विशेष बाब म्हणजे कालच नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असल्याची चिंता व्यक्त केली होती. नसीम खान हे चांदिवली विधानसभेतून काँग्रेसचे आमदार आहेत.

[amazon_link asins=’B072XP1QB7,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’73bc055d-bb11-11e8-b494-e3a622fad1f2′]