सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरण : महिला पोलीस अधिकारी निलंबीत

 हरियाणा : वृत्तसंस्था

सीबीएससी टॉपर मुलीच्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने हरियाणा हादरले आहे. हरियाणाच्या रेवाडी शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात मात्र आता एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आलं आहे.

पोलीस उप-अधिक्षक हिरामणी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आरोपीला पकडण्यामध्ये दिरंगाई केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपींना पकडण्यामध्ये वेळ वाया घालवण्यात आला, त्यामुळे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जातं आहे.

[amazon_link asins=’B07417987C,B00L8PEEAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b86e955-bb0e-11e8-b71f-7b2ce2ecc1d7′]

बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी नीशूला पोलिसांनी अटक केल्याची माहिती याआधी पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तसेच प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीने ३० तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली. दीनदयाल आणि डॉ. संजीव यांचा यामध्ये समावेश आहे. तर मुख्य आरोपी नीशूलाही पकडण्यात यश आले होते. पोलिसांनी दीनदयाल हा ट्यूबवेलचा मालक आहे. तिथेच ही घटना घडली. तर संजीव डॉक्टर आहे. त्याने आरोपींना मदत केली. तसेच या घटनेत सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याचे सांगितले. मुख्य आरोपी नीशूने हा संपूर्ण कट रचला होता. या कटात लष्कराचा एक जवान ही सहभागी आहे. मात्र तो सध्या फरार आहे.

गुरुवारी रेवाडी जिल्ह्यातील कनीना बस स्थानकावरुन पीडितेचे अपहरण करण्यात आले होते. यावेळी पीडिता कोचिंग सेंटरला जात होती. अमली पदार्थ खायला घालून पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या बलात्कार प्रकरणाला ५ दिवस उलटल्यानंतरही सर्व आरोपीना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाच्या तपासावर पीडित कुटुंबाने शंका उपस्थित केली आहे.

हिरो मोटो कॉर्पच्या बनावट वेबसाईटद्वारे व्यापा-यांना गंडविण्याचा प्रयत्न