सोशल मीडियावर येडियुरप्पा आणि भाजपच्या जोक्सचा धुमाकूळ

बंगळुरु: वृत्तसंस्था

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सोशल मीडियामधून जोक्सचा धुमाकूळ चालला होता पारले जी चे हारले जी झाले होते यात चक्क राहुल गांधींचा फोटो पार्ले जि च्या बिस्कीटच्या पॅकेट वर एडिट करून टाकण्यात आला होता. आता त्याचप्रमाणे येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशलवर जोक्सचा पाऊस पडतो आहे.

बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज संध्याकाळी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. भाजपा आमदारांची संख्या 104 असल्यानं त्यांना बहुमतासाठी आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांनी राजीनामा दिला. यानंतर सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो आहे.

https://twitter.com/sagarcasm/status/997787940477517825

https://twitter.com/ARanganathan72/status/997781978882723840