19 मार्च : Fast for Feeders / अन्नदात्यासाठी अन्नत्याग
19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही अलीकडच्या काळातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या मानली जाते.

तेंव्हापासून रोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होतेच आहे. आजपर्यंत लाखो शेत्कर्यानी आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला. शेतकरी विरोधी कायद्यांची ही भीषण परिणीती आहे.खरे तर या आत्महत्या नसून खून आहेत. म्हणूनच 19 मार्च रोजी उपोषण करुन सहवेदना व्यक्त  करण्यासाठी मी एक दिवस अन्नत्याग करणार आहे.

हा उपवास किंवा हे उपोषण शेतकऱयांविषयी आपली बांधीलकी बळकट व्हावी यासाठी आहे. हे उपोषण कोण्या विशिष्ट संघटनेचे वा पक्षाचे नाही. यात कोणीही सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी सुद्धा !!!

तुम्ही सार्वजनिक स्वरूपात एकत्रित येऊन उपोषण करू शकता. ते शक्य नसेल तर आपले आपण एकट्याने, आपले रोजचे काम करीतही उपवास धरू शकतात. तुम्हाला वाटले तर तुम्ही करीत असलेल्या उपवासाची माहिती सोशल मीडियावर टाकू शकता. मुद्दा एवढाच आहे की,  त्यादिवशी आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करायची !!!

मित्रानो, शेतकऱयांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. या उपोषणाच्या निमित्ताने आपण ही एकजूट करू शकतो.

मी या कामासाठी माझी पूर्ण शक्ती लावतोय, तुम्ही सामील झाला तर आपण गुलामीच्या बेडयांत अडकलेल्या शेतकऱयांना मुक्त करू शकू.

महाराष्ट्रातील तमाम किसानपुत्रांनी 19 मार्च रोजी उपवास धरावा, उपोषण करावे, अन्नत्याग करावा. हा  दिवस कदाचित शेतकऱयांना नवा प्रकाश देणारा ठरेल.

● अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन
Sahebrao Karpe with his wife from Chilgavhan Village/ चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पत्नी समवेत
Próxima
Limpar formulário
Nunca envie senhas pelo Formulários Google.
Este conteúdo não foi criado nem aprovado pelo Google. Denunciar abuso - Termos de Serviço - Política de Privacidade