दूध लिटर मागे ५ रुपयांनी महागणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या राज्यव्यापी दूध दर आंदोलनानंतर सरकारने तोडगा काढून ५ रुपये अनुदानाच्या रूपाने दूध उत्पादक संघाना देण्याची योजना अस्तित्वात आणली. अर्थात हा फक्त दूध दर वाढीच्या आंदोलनावर काढलेला तोडगा होता. परंतु सरकारने केलेली घोषणा तर पूर्णर्त्वास घेऊन जाणे सरकारला भाग होते म्हणून त्यांनी नव्याचे नऊ दिवस म्हणल्या प्रमाणे फक्त एका महिन्याचे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे अनुदान दुध उत्पादक संघांच्या खात्यावर भरले. त्यानंतर आज तागायत कसलेही अनुदान सरकार कडून देण्यात न आल्याने आता दूध संघांनी सरकारच्या या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

दूध अनुदानाबद्दल सरकार दरबारी विचारणा केली असता दुधाच्या अनुदान स्पुर्ती संदर्भात टोलवाटोलवीची उत्तरे सरकार कडून दिले जात असल्याने दूध संघ आणखी किती दिवस हात आखडून दूध पुरवठा करणार असा सवाल दूध संघांच्या वतीने विचारला जातो आहे. अशातच त्यांनी सरकारच्या उदासीन धोरणाला कंटाळून दूध अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशाराच सरकारला दिला आहे.

दूध उत्पादक संघानी सरकारला १५ डिसेंबर पूर्वी त्यांचे अनुदान ५ रुपये प्रतिलिटर या प्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा नाही झाल्यास १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी या योजनेतून बाहेर पडण्याची घोषणा करून १६ डिसेंबर पासून नवीन दराने म्हणजे ५ रुपये दरात अतिरिक्त वाढ करून दूध वितरित केले जाईल असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. सरकारने जर यावर तोडगा काढला नाही तर दूध दराचा अचानक भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ५ रुपयांच्या दूध दर वाढीची झळ सर्वसामान्य ग्राहकांना सोसावी लागणार आहे. सरकारने यावर लागलीच निर्णय घ्यावा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंचा भाजप रामभक्तांवर निशाणा