सुवर्ण यश मिळवून देणाऱ्या तेजिंदरच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकीत विक्रमासह भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तेजिंदर सिंग तूरचे वडिलांना ते पदक दाखवून त्यांच्या कौतुकाची थाप मारुन घेण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. जकार्ता येथून मायदेशी परतल्यावर विमानतळावरच वडिलांच्या निधनाची वृत्त त्याला मिळाले आणि सुवर्ण जिंकल्याचा आनंद क्षणात विरला. कँसरशी झगडणाऱ्या त्याच्या वडिलांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले.

[amazon_link asins=’B01LW1IADQ,B01N5JIT57′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fad9e5b5-b001-11e8-a8d6-c7bdb0f23c52′]

जाकार्ता येथून तेजिंदर सिंग विमानतळावर उतरला. त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी असंख्य क्रीडाप्रेमी जमले होते. विमानतळावरुन बाहेर आल्यावर हार घालून त्याचे स्वागतही करण्यात आले. त्यानंतर तो हॉटेलमध्ये जाण्यास निघाला असताना त्याला वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. लुधियाना येथेही त्याचे वाजत गाजत स्वागत करण्याची तयारी करण्यात आली होती.

परंतु,  त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त त्यांना समजले. त्यामुळे त्यांचीही अवस्था विचित्र झाली. सुवर्ण पदक मिळविले म्हणून त्याचे अभिनंदन करावे की वडिलांच्या निधनामुळे सांत्वन करावे, अशी विचित्र अवस्था निर्माण झाली.

तेजिंदरने २०.७५ मीटर गोळाफेक करून आशियाई स्पर्धा विक्रमासह भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. मागील बरीच वर्ष तेजिंदरचे वडील करम सिंग यांचा घश्याच्या कँसरशी संघर्ष सुरू होता. त्यांना बोलताही येत नव्हते. त्यामुळे सुवर्णपदक जिंकल्याचे निरोप आईच्या माध्यमातून वडिलांना कळवला होता. मायदेशात परतल्यावर ते पदक घरच्यांना दाखवण्यासाठी तो आतुर होता, परंतु नियतीला ते मान्य नसावे.

शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली. आशियाई स्पर्धेचे सराव शिबीर पतियाळा येथे भरलेले होते. त्यावेळी तो सरावाचे वेळापत्रक सांभाळून लुधियानाला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जायचा. काही काळ त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरही झाला होता. मात्र, प्रशिक्षकांनी समजावल्यानंतर त्याने सरावावर लक्ष केंद्रित केले. तेजिंदरच्या वडिलांच्या जाण्याचा क्रीडा वतुर्ळात शोक व्यक्त केला जात आहे.

भारताचा बॉक्सर अमित पांघलला सुवर्णपदक