डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या अगोदरच्या आरोपत्रामुळे नवा वाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सचिन प्रकाशराव अंदुरे (रा. औरंगाबाद) याला सीबीआयकडून अटक करण्यात आली. मात्र, सीबीआयने शिवाजीनगर न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या आरोपपत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांचा मारेकरी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आरोपी मारेकऱ्यांची ओळख पटवलेले साक्षीदार असल्याचाही दावा सीबीआयने केला. त्यामुळे आता या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींसाठी बचावाचा मोठा पुरवा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने पकडलेल्या आरोपींमुळे नवा वाद समोर आला आहे. या प्रकरणाचा लेखाजोगा नुकताच पोलीसनामाने मांडला होता.
[amazon_link asins=’B071LJZGPB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’251ece50-a615-11e8-ad8b-87e17d74e402′]

सीबीआयने पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात ६ सप्टेंबर २०१६ रोजी वीरेंद्रसिंह तावडे याच्या विरुद्ध आरोपपपत्र दाखल केले होते. ज्यामधे वीरेंद्रसिंह तावडे याला दाभोलकरांच्या हत्येमागील मुख्य सुत्रधार सांगण्यात आले होते. या आरोपपत्रातच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी तावडेच्या सांगण्यावरुन दाभोलकरांची हत्या केल्याचं म्हटले आहे.

त्यासाठी पुरावा म्हणून दोन प्रत्यक्षदर्शींनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची स्केचेसच्या आधारे ओळख पटवल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलं. त्याचबरोबर कधीकाळी वीरेंद्रसिंह तावडेचा सहकारी असलेल्या संजय साडवीलकर यांच्या जबाबाचा हवाला देण्यात आला. आता बचावपक्ष त्याचा स्वत:च्या बचावासाठी वापर करण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
[amazon_link asins=’B0796XQR43′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d38a110-a615-11e8-a6b8-e73c8b0727d8′]

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरे हाच दाभोलकर हत्या प्रकरणातील शूटर आहे, असं सीबीआयचं म्हणणं आहे. मात्र अगोदर सादर केलेल्या आरोपपत्राचा हवाला हा नव्याने अटक केलेल्या आरोपींसाठी बचावाचा सर्वात मोठा मार्ग ठरु शकतो, असं सूत्रांचं म्हणणं आहे.