एशियन बेकर्सवर भविष्य निर्वाह कार्यालयाची कारवाई

सातारा :  पोलीसनामा ऑनलाईन

कामगारांच्या पगारातून कपात केलेली कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी वाई येथील प्रसिद्ध एशियन बेकर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एशियन बेकर्सच्या मालकाने कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कपात केली. मात्र, संबंधीतांच्या खात्यावर ही रक्कम भरली नाही. डिसेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत २ लाख १४ हजार रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार कोल्हापूर येथील क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अंमलबजावणी अधिकारी गोपाळ जोशी यांनी वाई पोलीसात गुन्हा दाखल केला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa99dd61-cd52-11e8-aa88-5b8d55ac2cfe’]

कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेची कपात करून ती प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत ऑनलाईन चलनाद्वारे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खात्यात भरणे  मालक अथवा संबंधीतांनी आवश्यक असते. असे असताना ही वाई एमआयडीसी मधील एशियन बेकर्सच्या मालक अंजुम मुसा खतीब  (रा.रामापूर ता.पाटण .जि.सातारा) याने डिसेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीतील २ लाख १४ हजार एवढी कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम त्यांच्या खात्यात भरलेली नाही.

[amazon_link asins=’B072PZ5143,B07D8TMSLT,B07B9TC2WV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d46b1f9c-cd53-11e8-8afb-b568ff89ad7f’]

याबाबत क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय ,कोल्हापूर यांच्या कडून लेखी सुचना, कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ही अंजुम मुसा खतीब याने सदर रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन भरणा केली नाही. हे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरोधात वाई पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यातून टाटा सुमो चोरीला

कोल्हापूरच्या क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त सौरभ प्रसाद आणि सहाय्यक आयुक्त सेवाशरण वर्णवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी गोपाळ जोशी यांनी वाई पोलीसात सदर प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.