प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला

नागभीड ( चंद्रपूर ) :  पोलीसनामा ऑनलाईन

चंद्रपूरमध्ये प्रेयसीने प्रियकरावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागभीड़ विश्रामगृहासमोर सोमवारी रात्री ८.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून प्रियकरासोबत झालेला वाद विकोपला गेल्याने प्रेयसीने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. भांडण नेमके कशामुळे झाले याची माहिती समोर आली नाही.

किशोर जगदीश पाथोडे असे जखमी प्रियकराचे नाव आहे. तसेच या वादात युवतीही जखमी झाल्याने तिलाही उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकराबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येची चॅटिंग : दोघांना अटक

आत्तापर्यन्त एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला किंवा प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला यांसारख्या घटना घडल्या आहेत परंतु प्रियकरासोबत भांडण झाल्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची घटना दुर्मिळातील दुर्मिळ आहे. सुदैवाने या घटनेत प्रियकर बचावला असून त्याला गंभीर जखमी अवस्थेत नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B017WDVV3M,B01M3QQOAX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e73361f9-bb1d-11e8-b654-751029577cef’]