मुलगा कधीच निवडणूक हरला नाही, तर बाप कधीच जिंकला नाही 

रायपूर : वृत्तसंस्था  – “क्या हार में क्या जीत में, किंचित नही भयभीत मै” या अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळी समर्पित राजकारणी व्यक्तीसाठी साजेशा आहेत. निवडणुकीच्या रणांगणात कोण जिंकते किंवा हारते या यशाची जोडणी माणसे नशिबाशी करतात परंतु ते नशीब असतं का ?  छत्तीसगड मधील अशीच एक बाब उजेडात आली असून त्यात वडील कधीच निवडणूक जिंकले नाहीत तर मुलगा निवडणूक कधीच हरला नाही.

लखीराम अग्रवाल हे छत्तीसगड भाजप मधील मोठं नाव. गरीब कुटूंबातून आलेले लखीराम हे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. परंतु लखीराम हे कधीच निवडणूक जिंकलेले नाहीत. १९६२ साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा ते निवडणूक जिंकले नाहीत तर त्यांचे या निवडणुकीत स्थान चौथ्या क्रमांकाचे होते. त्यानंतर त्यांनी १९६७ साली दुसऱ्यांदा निवडणूक लढवली तेव्हा हि त्यांचा धरमजयगढ मतदारसंघातून पराभव झाला. तिसऱ्यांदा त्यांनी १९७७ मध्ये सरिया मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा हि त्यांचा पराभवच झाला शेवटी त्यांनी खरसिया मतदारसंघातून निवडणूक लढवली पण निकालाने थोडक्यात हुलकावणी दाखवली फक्त ३ हजार ८९३ मतांनी त्यांना  काँग्रेसच्या नंदकुमार पटेल यांनी पराभूत केले. त्यानंतर त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीचा नाद सोडला पुढे त्यांनी आपल्या मुलाला  म्हणजे अमर अग्रवाल यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. अमर अग्रवाल यांनी मात्र वडिलांची सगळी कसर भरून काढत चर वेळा विधानसभेवर विजयी छलांग मारली. तर लखीराम अग्रवाल यांनी १९९० ते २००० येवढा प्रदीर्घ काळ राज्यसभा सदस्य म्हणून काम पहिले.

अमर अग्रवाल हे बिलासपूर मतदार संघातून सलग चारवेळा विधानसभेवर गेले असून त्यांना पहिली निवडणूक १९९८ साली लढवली होती. छत्तीसगड हे भाजपची बुज राखणारे राज्य परंतु तरीही लखीराम अग्रवाल यांचा पराभव झाला यात नशिबाचा काही भाग नक्कीच असावा. तर अमर अग्रवाल हे पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक बिलासपूर मतदार संघातून लढवत आहेत. या निवडणुकीत हि त्यांच्या विजयाची खात्री वर्तवण्यात येत आहे.

राहुल गांधींकडून मोदींना ओपन चॅलेंज