महिलांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का बाळगलेय : खा. सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातच नव्हे तर देशभरात मुली आणि महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण तर धक्कादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत महिलांचा विकास, सुरक्षा याबद्दल बोलत असतात. मात्र, देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली असताना व दररोज अत्याचाराच्या घटना घडत असताना ते मौन का बाळगत आहेत? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

[amazon_link asins=’B0047Z5L9Y,B01GRI6Q3I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36af77c7-b89f-11e8-baf2-67ae07c4d954′]

पुरोगामी भारतात महिलांवरील अन्याय-अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षण, सुरक्षिततेबाबत बोलत असतात. मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. याबाबत ते मौन बाळगून का आहेत, असा प्रश्न  सुळे यांनी उपस्थित केला. हरयाणात मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हरयाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. या घटनेचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध करायला हवा. महाराष्ट्रातही सातत्याने मुलींची छेडछाड, बलात्कार अशा घटना घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होऊन बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

चालकाला मारहाण करून, कारसह रोकड लुटली

सरकारच्या गुन्हे अहवालात अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. याचे उत्तर कोण देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रिपद आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींचे अपहरण करून उचलून नेण्याची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एकही शब्दही काढला नाही. हे या सरकारचे अपयश आहे, अशी घणाघती टीका खासदार सुळे यांनी केली.