खडक पोलिसांनी सापडलेली बॅग केली परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ या ब्रीद वाक्याप्रमाणे काही पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. एखाद्याची हरवलेली वस्तू देण्यापासून ते सापडलेली वस्तू त्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे काम पोलीस इमानदारीने करीत असतात. सापडलेल्या वस्तूच्या मोहात न पडता पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशीच एक घटना खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e20cd28d-bb32-11e8-839c-d78850b21676′]

खडक पोलीस ठाण्यातील पोलीस पोलीस नाईक शेडगे पोलीस कॉन्सेटबल वलवी हे दिवस पाळी ड्युटीवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी हरेकर या इसमाने चिंचेची तालीम येथील सिता आपर्टमेंटच्या पार्किंगमध्ये बेवारस सुटकेस असल्याचे सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन सुटकेस ताब्यात घेऊन पाहणी केली.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की 

सापडलेली बॅग लॉक असल्यामुळे ती बॅग कोणाची आहे हे समजू शकले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेस विषयी आजुबाजूला चौकशी केली. मात्र ती कोणाची आहे हे समजू शकले नाही. अखरे पोलिसांनी सुटकेसच्या खऱ्या मालकाचा शोध घेतला. ही बॅग शुक्रवार पेठेतील डॉ. आशिष दरवडे यांची होती. सुटकेसमध्ये ५० हजार रुपयांची रोकड, ५० हजार रुपयांचे सर्जरी करण्याचे साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज त्या सुटकेसमध्ये होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी ती सुटकेस डॉ. दरवडे यांच्या स्वाधीन करुन आपली इमानदारी सिद्ध केली.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येची चॅटिंग 

दोन महिन्यांपूर्वी पुणे वाहतुक पोलीस आयुक्तांच्या गाडीवर चालक असणारे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर लोंढे, पोलीस शिपाई अजय कदम यांना रस्त्यावर एक पाकीट सापडले होते. मुंबई हायकोर्टातील वकील मनोज गडकरी यांचे ते पाकीट होते. लोंढे आणि कदम यांनी पाकीटातील फोन नंबरवरुन पाकीट सापडल्याची माहिती गडकरी यांना देऊन पाकीट त्यांच्या स्वाधीन केले होते. या पाकीटात २५ हजार रुपये रोख आणि काही महत्वाची कागदपत्र होती.