महाराष्ट्र पोलिसांनी स्वीकारले गुजरात मॉडेल : नवाब मलिक

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

भाजप आणि आरएसएसचे सरकार पाडण्याचा माओवाद्यांचा डाव आणि षडयंत्र होते. याचा अर्थ सरकारने तयार करुन दिलेली प्रेस पोलिस वाचत होते. म्हणजेच महाराष्ट्र पोलिसांनी गुजरात मॉडेल स्वीकारले आहे हे सिध्द होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आज (३१ ऑगस्ट) महाराष्ट्र पोलिस पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलीक माहिती देत होते.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3328581e-ad24-11e8-8b7b-d10ef88ce9a1′]

आज महाराष्ट्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका होता असं म्हटलं आहे. जर मोदींना मारण्याचा कट होता आणि त्याची माहिती तुमच्याकडे आली होती तर ती माहिती आणि कागदपत्रे उच्चस्तरीय चौकशी समितीकडे किंवा आयबीकडे का सुपूर्द करण्यात आली नाहीत असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

विखे पाटील यांनी घेतली पानसरे कुटुंबियांची भेट 

आजच्या पोलिसांच्या पत्रकार परिषदेतून काहीजण डी.जी.वंजारा यांच्यापासून प्रोत्साहीत झालेले दिसले तर काहीजणांना सत्यपालसिंग व्हायचे आहे हे यावरुन सिध्द होत आहे. एकप्रकारे गुजरात मॉडेल महाराष्ट्र पोलिसांनी स्वीकारले आहे हे स्पष्ट होत आहे असेही नवाब मलिक म्हणाले. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना पोलिसांनी पत्रकार परिषद घ्यायला नको होती असेही नवाब मलिक म्हणाले.

Please Subscribe Us On You Tube