चिंचवड पोलीस ठाण्याच्या जवळच पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड मध्ये पूर्ववैमण्यसातून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड पोलीस ठाण्याच्या जवळ घडली आहे. मयत तरुणाला चौघांनी गाठून कोयता, सिमेंटचे गट्टू, लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला आहे. आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

आकाश लांडगे (वय-२० रा.चिंचवडगाव) अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रणजित चव्हाण,बाबा मोरे अस हल्लेखोर संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी दोघे जण आहेत मात्र त्यांची नावे समजू शकले नाहीत. त्यांचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आकाश लांडगे याचा पूर्ववैमन्यातून रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड पोलीस ठाण्याच्या जवळच संशयित गुन्हेगार रणजित चव्हाण,बाबा मोरे आणि आणखी दोघांनी लोखंडी रॉड, कोयता,सिमेंटचे गट्टू याने वार करून खून केला.मयत आकाश याच्यावर गुन्हे दाखल होते.तर रणजित चव्हाण वर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

रात्री साडेअकराच्या सुमारास आकाशच्या गाडीचे पेट्रोल संपले होते.तो पेट्रोल आणण्यास गेला त्यावेळी मामाच्या नोकराला सोबत घेऊन आला मात्र पेट्रोल टाकून सुद्धा गाडी सुरू होत नव्हती त्यामुळे तेथे गाडी सोडून निघणार तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या चौघांनी  आकाशवर धारदार शस्त्रांनी आणि सिमेंटच्या गटातून,लोखंडी रॉडने वार केले यात आकाश गंभीर जखमी झाला त्याला खासगी रुग्णालयात घेऊन गेले परंतु त्याचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.