…मुख्यमंत्री झालो तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता : देवेंद्र फडणवीस

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन

मुख्यमंत्री काका तुमच्यामुळे वाचलो, तुम्हाला एक फूल देतो’, असे म्हटल्यानंतर जो मनस्वी आनंद झाला तो मुख्यमंत्री झाल्यावरही इतका नव्हता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतलं. ते धुळ्यामध्ये बोलत होते.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’490ba74e-ba84-11e8-84b1-8d5abd144505′]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर असताना गरीब कुटुंबातील २० ते २५ मुलं माझ्याकडे आले होते. तेव्हा ते म्हणाले मुख्यमंत्री काका तुमच्यामुळे वाचलो, तुम्हाला एक फुल देतो, तेव्हा जो आनंद झाला तो मुख्यमंत्री झालो तेव्हाही झाला नव्हता, असा उजाळा मुख्यमंत्र्यांनी अटल बिहारी आरोग्य महाशिबीराच्या उदघाटनाच्या वेळी बोलताना दिला.

मराठ्यांच्या राजकीय पक्षासाठी हर्षवर्धन जाधव घेणार चिंतन बैठक 

प्रत्येकाला आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबर निरामय आरोग्य ही गरज झाली आहे. महाशिबिरानंतर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. राज्यात आतापर्यंत झालेल्या महाशिबिराव्दारे 25 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला, असंही त्यांनी यावेळी सांगीतलं.

[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d265b461-ba84-11e8-8ce0-cfea34080e85′]

सामान्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यात महाशिबिरासारखे उपक्रम राबविले जात आहेत. सर्वसामान्यांनी फक्त आर्शिवाद आमच्या पाठीशी राहू द्यावा, असं भावनीक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.