व्हिडिओ गेम नंतर आता नेटफ्लिक्स अ‍ॅप्सचे अ‍ॅडिक्शन 

बंगलुरु : वृत्तसंस्था – तरुणांना पूर्वी तासंतास व्हिडिओ गेम खेळण्याचे व्यसन लागलेले दिसून येत असे. आजही अनेक जण अनेक तास व्हिडिओ गेम खेळत असतात. त्यावेळी त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला अथवा त्यात अडथळा आला तर त्यांची चिडचिड होताना दिसते. व्हिडिओ गेम पाठोपाठ आता नेटफ्लिक्स अ‍ॅप्सवर व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागू लागले असून अशी एक केस बंगलुरु येथे समोर आली आहे.

२०१९ मध्ये कमळच फुलणार, सी वोटर्स आणि एबीपी माझाचा सर्वे 

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनंतर आता यूजर्सना नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन आणि हॉटस्टारसारख्या अ‍ॅप्सच्या अ‍ॅडिक्शनची समस्या होत आहे.  येथील एका २६ वर्षीय तरुणाला दिवसातील १० ते १२ तास नेटफ्लिक्सवर व्हिडीओ बघितल्याने ही सवय लागली आहे. त्याचा परिणाम असा झाला की, या तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागलेय.

नेटफ्लिक्सची लागलेली सवय सोडवण्यासाठी तरुणावर बंगळुरु नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल हेल्थ अ‍ॅन्ड न्यरोसायंसमध्ये उपचार सुरु आहेत. या तरुणावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, साधारण ६ महिन्यांपूर्वी तरुणाची नोकरी सुटली होती. यादरम्यान त्याला नेटफ्लिक्सवर व्हिडिओ बघण्याची सवय लागली.

जाहिरात

हळूहळू ही सवय इतकी वाढली की, तो दिवसातून १०-१० तास नेटफ्लिक्सवर आणि काही इतरही प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहू लागला होता. या तरुणाच्या आई-वडिलांनी डॉक्टरांना सांगितले की, जेव्हा इतका वेळ व्हिडीओ बघण्यावरुन त्याला आम्ही हटकले.  तेव्हा तो चिडचिड करायचा, रागवायचा आणि आक्रमकही होत होता.

यावर भारतात २ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या नेटफ्लिक्सने यावर काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तरुण पिढी मल्टिपल स्क्रीन डिसआॅर्डरे ग्रस्त होत आहे. म्हणजे त्यांना सतत कोणती ना कोणती स्क्रीन हवी असते. मग ती कम्प्युटर असो, लॅपटॉप असो वा टॅबलेट किंवा मोबाइल असो.

जाहिरात