अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यादृष्टीने राज्य मंत्रिमंडळातही काही फेरबदल केले जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, ही भेट होऊ शकली नव्हती. दरम्यान, अमित शहाच मंगळवारी अचानक मुंबईत दाखल झाले. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. शहा यांच्या मुंबई भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c571e4bd-d1c8-11e8-92fd-d510c96f6a68′]

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर विलेपार्ले येथील बैठकीनंतर अमित शाह रात्री आठ वाजता पुन्हा दिल्लीला रवाना झाले. या तीन तासांत बंद दारामध्ये झालेल्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून शाह यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

[amazon_link asins=’B07CZ5C1Q2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d290f615-d1c8-11e8-815d-4df763e217cc’]

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होणार होते. मात्र, तो मुहूर्त टळला आहे. राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात शिवसेनेला सोबत ठेवणे हे भाजपासमोर आव्हान असणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाच्या विविध योजनांचा शुभारंभ मुंबईत करणार आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण देशाच्या विविध भागात करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसोबत विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ या संघाच्या कार्यालयात बैठक घेतली. मोदींच्या या महाराष्ट्र दौऱ्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी संपलीय, शेकाप संपण्याच्या मार्गावर : अनंत गिते

जाहिरात