पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक ; ३ पोलीस जखमी तर दरोडेखोर ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या दरम्यान सोलापूर शहराजवळील उळे गावाजवळच गस्त घालताना पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. त्यानंतर एका दरोडेखोरला पकडून गाडीत घालत असताना तो दरोडेखोर पोलिसांना साहेब चुकले चुकले म्हणत असताना त्याने त्याच्या हातातील तलवारीने पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये पाटील हे जखमी झाले. पोलीस अधिकारी पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला. दरोडेखोर गोळीबारामध्ये जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला आहे.

Solapur : Encounter between Police and robbers, one robber died in Police firing | सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार

उळेगावात पोलीस दरोडेखोरात धुमचक्री झाल्याने सोलापूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीसांच्या स्वसंरक्षणात केलेल्या फायरींग मध्ये एक दरोडेखोर गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात मरण पावला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

घटनास्थळी सकाळी २ कार आढळल्या आहेत. यातील एका गाडीचा क्रमांक Mh-13 AZ / 1798 असा असून एका गाडीच्या काचाही फुटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या गाड्या पोलिसांच्या आहेत की दरोडेखोरांच्या, याचीही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.