#MeToo: हाऊसफूल-4 मध्ये नानांच्या जागी ‘या’ दोन अभिनेत्यांची चर्चा

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – तनुश्री दत्ताने नाना पाटेकर विरुद्ध आरोप केल्यानंतर बॉलिवुडमध्ये #MeToo ची चळवळ सुरु झाली आहे. प्रत्येकजण मी टूच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. मात्र, तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपामुळे नाना पाटेकरला हाऊसफूल ४ मधून बाहेर पडावे लागले. आता नाना ऐवजी कोण काम करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

बॉलिवुडमध्ये #MeToo वर एकामागे एक खुलासे होत आहेत. या यादीत आतापर्यंत नाना पाटेकर, संस्कारी आलोक नाथ, विकास बहल आणि कैलाश खेर यांच्यासह अनेकांवर आरोप झाले आहेत. याशिवाय सुभाष घई, पियूष मिश्रा आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर देखील आरोप झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e41cc7f6-cfbd-11e8-9a16-65ba2677be4a’]

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo चळवळ सुरु झाली. तनुश्रीने नानांवर १० वर्षापूर्वी रिलीज झालेला सिनेमा ‘हॉर्न ओके प्लीज’च्या शूटिंगदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये २ गट पडले आहेत. काही जण तनुश्रीच्या बाजुने आहेत तर काही जण नानांच्या बाजुने उभे आहेत. साजिद खान आणि नाना पाटेकरांवर आरोप झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने हाऊसफूल 4 सिनेमाचं शूटींग थांबवण्याची मागणी केली आहे.

#MeToo : पुर्ण चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कारवाई झालीच पाहीजे 

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06fb7a6f-cfbe-11e8-9d20-f920bdfc6bda’]

साजिद खाननंतर आता नाना पाटेकर देखील हाउसफुल 4 सिनेमातून वेगळे झाले आहेत. आता अशी माहिती येते आहे की, नानांची जागा संजय दत्त किंवा अनिल कपूर घेऊ शकतात. या दोन्ही नावांवर सध्या विचार सुरु आहे. संजय दत्त लवकरच सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B074195JTG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7133666-cfbd-11e8-b2eb-33bb66979b5b’]

संजय दत्तकडे सध्या सिनेमा नाही. इतर सिनेमांचं शूटींग देखील पूर्ण झालं आहे. त्यामुळे संजय दत्तच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. साजिद खान बाहेर झाल्यानंतर त्य़ाच्या जागी साजिद-फरहादची जोडी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.