घटस्थापनेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

 

महामंडळ वाटपानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे. घटस्थापनेच्या दिवशी फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणाला डच्चू मिळतो आणि कुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. येत्या 10 ऑक्टोबरला हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
[amazon_link asins=’B0756W2GWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6eda8205-bb58-11e8-ac0a-95c0a03903ab’]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांचं कमबॅक अजूनही गुलदस्त्यात आहे.

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे-पाटील यांचं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर कृषीमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुढील आठवड्यात प्रत्येक खात्याचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. आढावा घेतल्यावर मंत्रिपद बदलाबद्दल संबंधितांना सांगितलं जाणार आहे.