बनावट नोटांच्या छापखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांची धाड

By Admin | Published: May 19, 2017 07:22 PM2017-05-19T19:22:31+5:302017-05-19T19:22:31+5:30

न्यू बायजीपुरा भागातील इंदिरानगर येथील एका घरात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या छापखान्यावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारली.

Crime Branch police conduct raids on fake currency notes | बनावट नोटांच्या छापखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांची धाड

बनावट नोटांच्या छापखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांची धाड

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंंगाबाद, दि. 19 - न्यू बायजीपुरा भागातील इंदिरानगर येथील एका घरात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या छापखान्यावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारली. या कारवाईत कारखान्याचा मालकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ५ लाख ५ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा आणि उच्च दर्जाचे स्कॅनर, कलर्स आणि काही पेपर जप्त करण्यात आले. यात दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

माजीद खान बिस्मील्ला खान (४२,रा. इंदीरानगर, बायजीपुरा) असे अटयाविषयी अधिक माहिती देताना आयुक्त यादव म्हणाले की, इंदीरानगर, न्यू बायजीपुरा भागातील एक जणाकडे बनावट नोटा असून तो पान टपरी जवळ राहातो. तो गेल्या काही दिवसापासून बनावट नोटांची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हेशाखेच्या पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधूकर सावंत, उपनिरीक्षक राहुल रोडे, कर्मचारी शिवाजी झिने, तुकाराम राठोड, नवाब शेख, रितेश जाधव, कुसाळे, वाघ यांनी इंदीरानगर येथील गल्ली नंबर २५ मधील आरोपीच्या घरावर रात्री २ वाजेच्या सुमारास पंचासह धाड मारली.

यावेळी आरोपीच्या घरात दोन हजार,पाचशे आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा, उच्च दर्जाचे स्कॅनर आणि कलर प्रिंटर आणि नोटा छापण्यासाठी लागणारे पेपर मिळाले. यात दोन हजार रुपयांच्या २१०नकली नोटांचा असून त्या ४ लाख २०हजार रुपयांच्या आहेत. ५०० रुपयांच्या १५२ नोटा असून ते७६ हजार रुपये आहेत. तर शंभर रुपयांच्या ९३ नोटा याप्रकाणे ९ हजार ३००रुपये असे सुमारे ५ लाख ५ हजार ३००रुपये किंमतीच्या या बनावट नोटा आहेत. याशिवाय बनावट नोटांची छपाई आणि स्कॅनिंग करण्यासाठी त्याच्याकडे ओरिजनल २३ हजार रुपये पोलिसांना मिळाले.

Web Title: Crime Branch police conduct raids on fake currency notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.