भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

नालासोपारा : पाेलीसनामा ऑनलाईन

भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना नालासोपारा येथे घडली आहे. रुपाली चव्हाण (वय ३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून त्या वसई-विरार येथे भाजपा युवती जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7360b6c-cba0-11e8-b0c4-eff0135f4958′]

रुपाली चव्हाण यांचा नालासोपारा येथील पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटमधील बी विंगच्या १०१ नंबर फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे हत्येची घटना उघडकीस आली. महत्त्वाचं म्हणजे त्यांची दोन दिवसापूर्वी हत्या झाली आहे. त्यांच्या शरीरावर वार आढळून आले आहेत तसेच इस्त्रीचे चटके आणि शॉकही दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही.

दरम्यान, नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fd0ddc5e-cba0-11e8-8605-0fa743ccd15b’]

मुंबईत बॉम्ब तयार करतानाच स्फोट

मुंबई : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सुतळी बॉम्बच्या दारुपासून बॉम्ब तयार करताना स्फोट झाला आहे. याप्रकरणी मुंबईतून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही आरोपी मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी असून मुंबईतील गरीब नवाज रोडवर नूरा बाजार भागात राहत होते. त्यांच्यापैकी अरजुल शेख हा २२ वर्षांचा आहे, तर दुसरा अल्पवयीन आहे.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02ba7f86-cba1-11e8-a2b5-dff3bf533671′]

बॉम्ब तयार करत असताना झालेल्या स्फोटामुळे सदर प्रकार उघडकीस आला. स्फोटाचा आवाज एक किलोमीटर परिसरात ऐकू आल्याचं रहिवासी सांगतात. स्फोटात दोघांपैकी एक तरुण जखमी झाला, तर आजूबाजूच्या झोपड्यांमधील सामानही खाली पडलं.
स्फोटानंतर पोलिसांनी झोपडीची तपासणी केली असता त्यात बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे सापडले. सर्वसाधारणपणे दहशतवादी अशा गोष्टी बॉम्बमध्ये वापरतात. सध्या हे सगळे स्फोटकसदृश्य पदार्थ तपासणीसाठी एफएसएलला पाठवण्यात आले आहेत.