नालासोपारा स्फोटके प्रकरणाची व्याप्ती राज्यभर; पुण्यातील दोघांसह 12 जण ताब्यात 

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

नालासोपारा घातपात प्रकरणाची व्याप्ती राज्यभर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी राज्याच्या विविध भागातून तब्बल 12 जणांना ताब्यात घेतलं असून,  हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्याप्रणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशदवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाचा विळखा आज वाढला असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

एटीएसने ही कारवाई करत,राज्यात सणासुदीच्या कालावधीत घातपात घडवून आणण्याचा मोठा कट हाणून पाडला आहे. काल केलेल्या कारवाईत शुभम राऊत याच्यासह शरद कळसकर, व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

 [amazon_link asins=’B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb624198-9d3b-11e8-a0b8-ed600eb4479d’]
तर इतर आरोपींना पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बाॅम्बस्फोच किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. या जिल्ह्यामध्ये आज कारवाई करत 12 जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
राऊतसह तिघांना 18 आॅगस्टपर्यंत न्यायालयाने एटीएसच्या कोठडीत पाठविले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.
पहा राऊत कसा सापडला एटीएसच्या जाळ्यातः
पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वाढत्या हालचाली पाहता गुप्तचर विभागाला संशय आल्यामुळे मागील काही दिवसापासून आश्रमावर पाळत ठेवण्यात येत होती. आश्रमात कोण-कोण लोक येतात, त्यांचा येथील वावर कसा आहे, सोबत येताना त्यांच्या बरोबर कोण असते, या गोष्टींचा अभ्यास करत असताना वैभव राऊतचा वावर सनातनच्या आश्रमातील स्पष्टपने लक्षात आला. राऊतच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पुढे त्याच्या घरावर पाळत ठेवण्यात आली असता, रात्रीच्या वेळी अनेक व्यक्ती त्याच्या घरी येतात, बराच वेळ थांबतात आणि पहाचेच्या वेळी घराबाहेर पडतात, यावरून त्याच्यावर संशय आल्यामुळे घरावर एटीएसने छापा टाकला आणि स्फोटकासह त्याला ताब्यात घेतले.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf41b00d-9d3b-11e8-8c9c-69b35d8023f0′]