पिंपरी : खदाणात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुंजी-पुनावळे गावाच्या मध्यभागी असलेल्या एका खदाणात ४० ते ४२ वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. मंगळवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून पोलीस शोध घेत आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64edec39-c644-11e8-8bda-b14b291ccbd3′]
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठे खदाण आहे. यामध्ये एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवला आहे.चार पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा अपघात आहे की घातपातीचा प्रकार आहे याचा शोध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस घेत आहेत.

[amazon_link asins=’B07C4RQ4L7,B01G1NRRTG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e27c1b81-c644-11e8-8bce-2592e81fc7bc’]

ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग

शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. ट्युशन शिक्षकाने ट्युशनसाठी आलेल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पिडित विद्यार्थीनीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान सकाळी सहा ते साडेसातच्या सुमारास घडला. पोलिसांनी ट्युशन शिक्षकाला अटक केली आहे. या घृणास्पद प्रकाराबाबत पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आनंद उर्फ जवान कमलाकर रोनाल्ड (वय-६८ रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोनाल्ड हा परिसरातील मुलांची ट्युशन घेतो. घटनेच्या दिवशी पिडित मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनला गेली होती. पुस्तक आणण्यासाठी व बॅग ठेवण्यासाठी टेरेसवर गेली. त्यावेळी आरोपी टेरेसवर गेला. त्याठीकाणी त्याने पिडित मुलीसोबत अश्लील बोलून तिच्याशी गैरवर्तन केले. घडलेला प्रकार मुलीने घरी आल्यावर आईला सांगितला. आईने येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध फिर्य़ाद दाखल केली. पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रोनाल्ड याच्याविरुध्द विनयभंगाचा तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करित आहेत.

[amazon_link asins=’B075VX7FHB,B00YGLFY9Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3366b7b3-c646-11e8-a4dd-8f8f3d44e67d’]

विश्रांतवाडीत ४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग

आई-वडिलांसोबत भाजी आणण्यासाठी गेलेल्या ४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी येथील कुस्ती आखाड्या समोरील भाजी मार्केटमध्ये ३० सप्टेंबर रोजी रात्री सव्वासाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पिडित मुलीच्या वडिलांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी ३५ वर्षीय अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिडित मुलचे आई-वडील भाजी मार्केटमध्ये भाजी खरदे करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत ४ वर्षाची मुलगी देखील होती. भाजी खरेदी केल्यानंतर मार्केटजवळ उभे होते. त्यावेळी आरोपीने ४ वर्षाच्या मुलीला मिठी मारुन तिच्यासाोबत गैरवर्तन केले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करित आहेत.

जाहिरात