हवालदाराची आत्महत्या : दोन महिला कॉन्स्टेबलना अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

पोलिस हवालदारास कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पोलिस मुख्यालयातील आणि कोडोली पोलिस ठाण्यातील दोन महिला कॉन्स्टेबलना सोमवारी अटक केली असुन न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दि. 24 सप्टेंबर रोजी सुनिल शामराव पाटील (42, रा. मंगळवार पेठ) यांनी कीटकनाशक प्राशन केले होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि.29) रोजी मृत्यू झाला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d78442b4-c607-11e8-a785-f5037e12aa70′]

पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यातील परवीन दस्तगीर मुल्‍ला (34, रा. इचलकरंजी) आणि पोलिस मुख्यालयातील साऊताई धनाजी चव्हाण (27, रा. कसबा बावडा) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मुल्‍ला आणि चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दोघींच्या खातेनिहाय चौकशीचेही आदेश अप्पर पोलिस अधिक्षक तिरूपती काकडे यांनी दिले आहेत. सुनिल पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी काही जणांकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अटक केल्यानंतर दोघींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. चव्हाण आणि मुल्‍ला यांच्याकडे होणार्‍या मानसिक त्रासाला तसेच मिळणार्‍या नोकरी घालविण्याच्या धमकीला कंटाळुन पाटील यांनी कीटकप्राशन केले होते. सन 2012 ते 2014 दरम्यान पोलिस हवालदार सुनिल पाटील, महिला कॉन्स्टेबल चव्हाण आणि मुल्‍ला हे तिघे गांधीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामधुन दोघींनी पाटील यांच्याकडे लग्‍न करण्याचा तगादा लावला. वेळावेळी होणार्‍या मानिसक छळाला पाटील कंटाळले होते आणि त्यातुनच कंटाळून त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली असे पाटील यांची पत्नी उमा पाटील यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, हवालदार सुनिल पाटील यांच्या आत्महत्येने कोल्हापूर पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी काही जणांकडे चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dd27e555-c607-11e8-a3e1-7f326a8db721′]

जाहिरात

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’af1077d9-c608-11e8-a75c-4d42b73233d7′]