जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जगन्नाथ मंदिर : राष्ट्रपतीच नाही तर महात्मा गांधी आणि इंदिराजींसोबतही झालं होतं गैरवर्तन

जगन्नाथ मंदिर : राष्ट्रपतीच नाही तर महात्मा गांधी आणि इंदिराजींसोबतही झालं होतं गैरवर्तन

जगन्नाथ मंदिर : राष्ट्रपतीच नाही तर महात्मा गांधी आणि इंदिराजींसोबतही झालं होतं गैरवर्तन

केवळ राष्ट्रपती कोविंद यांनाच नाही तर इंदिरा गांधी आणि महात्मा गांधींनाही मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    **पुरी,ता.27 जून:**राष्ट्रपति रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गैरवर्तन केल्याचा मुद्दा समोर आला आहे. राष्ट्रपती त्यांच्या पत्नीसमवेत मार्चमध्ये पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गेले होते. त्यावेळी पुजाऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवला आणि गैरवर्तन केलं. राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नाराजी कळवली होती. राष्ट्रपती कार्यालयाच्या पत्रानंतर प्रशासनानं तीन पुजाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे.झाल्याप्रकाराबद्दल आता अधिकाऱ्यांनी माफीही मागितली आहे.

    ‘आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब, निष्ठावान सेवक’, सामानातून मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त केली चिंता

    संतापजनक ! तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने आजोबावर कुऱ्हाडीने केले वार

    परंतु राष्ट्रपतती कार्यालयाने ते स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि स्पष्टीकरण मागितले आहे. जगन्नाथ मंदिरात मान्यवरांसोबत गैरवर्तन होण्याची ही पहिलीच वेळ नाही या आधी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यासोबतही या मंदिरात गैरवर्तन झालं आहे.

    आता घरी मोबाईलवरही बनवू शकता पासपोर्ट !

    जगन्नाथ मंदिरात फक्त हिंदूनाच प्रवेश आहे, असा बोर्ड लावण्यात आला आहे. मंदिराच्या नियमानुसार केवळ शंकराचार्यच यात बदल करू शकतात. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांनाही मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करणायत आला होता. त्यांनी पारसी व्यक्तीशी विवाह केला त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचं कारण त्यावेळी सांगितलं गेलं. ‘मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?’ राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीनं केला आत्महत्येचा प्रयत्न केवळ राष्ट्रपती कोविंद यांनाच नाही तर इंदिरा गांधी आणि महात्मा गांधींनाही मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. महात्मा गांधी यांनी त्यांच्यासोबत मुस्लीम, हरिजन आणि दलितांना घेऊन मंदिरात गेले होते. 1984 मध्ये राजीव गांधी पत्नी सोनियांसोबत काठमांडूला गेल्या होत्या तेव्हा त्या ख्रिश्चन असल्याने पशुपतिनाथ मंदिरात प्रवेश करण्यापासून त्यांना रोखण्यात आलं होतं. नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं दागिने घालून फिरताय? सावधान, पुण्यात 11 महिलांची मंगळसूत्रं लंपास 1998 मध्ये जेव्हा सोनियांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्या तिरूपतिच्या दर्शनाला गेल्या असतानाही अशीच घटना समोर आली होती. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात पुजारी आणि पंड्यांचा सुळसुळाट आहे. वर्षांनुवर्षाच्या पारपरिक व्यवसायांमुळे हे पुजारी आणि पंडे मुजोर बनले आहेत अशा तक्रारी भाविकांनाही अनेकदा केल्या आहेत. मात्र त्यांच्या दादागिरी समोर प्रशासनाला फारसं काही करता आलं नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात