२ हजाराच्या नव्या नोटा बंद होणार ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – देशात २ हजाराच्या चलनाची संख्या व्यवहारातून कमी होत आहे. त्यात २ हजारांच्या नोटांची छपाई पूर्णत: थांबविल्याने २ हजारांच्या नोटा बंद होतील की काय ? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा जोर धरू लागलीय. त्यात २ हजारांच्या कोट्यवधी बनावट नोटा विविध राज्यात पोलिसांच्या छाप्यात सापडत आहेत. या नोटांचे चुकीचे रंग, उडणारे पुसट रंग आणि नोटा छापण्यातही मोठ्या चुका होत्या.
देशाचे सर्वात महागडे चलन नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये न छापता आरबीआयच्या नवीन प्रेसमध्ये छापण्यात आले. याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे नोटा न छापण्या मागची कारणे काय ? हे सरकारने स्पष्ट करणं गरजेचे आहे.

याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. केंद्र शासनाच्या प्रेसमधून २ हजारच्या नोटा का बंद केल्या ? या नोटा न छापण्यामागची कारणे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. सध्या बाजारात या नोटांशी साधर्म्य असलेल्या बनावट नोटा आल्या असून त्या कशा आल्या याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

२ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. बाजारातील ८६ टक्के नोटा रद्द झाल्याने लोकांकडे व्यवहारासाठी पैसाच राहिला नाही. तेव्हा सरकाने २ हजार रुपयांची नवी नोट बाजारात आणली. २ हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करता येणार नाही, असा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र, त्या नंतर काही काळातच २ हजार रुपयांशी साधर्म्य दर्शविणाऱ्या नोटा बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. या नोटांचे रंग चुकीचे आणि पुसट आहेत. नोटा छापण्यामध्ये अनेक चुका झालेल्या दिसून येत आहेत.

त्यामुळे पूर्वी ५०० रुपयांच्या नोटा घेताना लोक व व्यावसायिक जसे या नोटा पारखून घेऊ लागले होते. तशीच स्थिती आता २ हजार रुपयांच्या नोटाबाबत होऊ लागली आहे. त्यामुळे या नोटा बनावट असल्याच्या संशयाने अनेक ठिकाणी पोलीस त्या जप्त करीत आहेत. त्यात सरकारने नव्या २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचे वृत्त आल्याने आता याही नोटा बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नोकराच्या मदतीने पतीनेच केला ताहेरा बानोंचा खून !