पिस्तुलाचा धाक दाखवत शिक्षक आणि विद्यार्थांना धमकी

नागपूर : पोलीसनामा आॅनलाईन 

दोन गुंडांनी चक्क शिकवणी वर्गासमोर येऊन पिस्तुलाचा धाक दाखवत शिक्षक आणि विद्यार्थांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे. गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयटी पार्कमध्ये गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन त्रिपाठी असं या शिक्षकांच नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf5ced3b-ce25-11e8-bd4f-cf2c772fb6a3′]

नितीन संतोष त्रिपाठी (वय ४१) हे परसिस्टन्सजवळ शिकवणी वर्ग घेतात. गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शिकवणी वर्ग संपल्यानंतर ते बाहेर आले. यावेळी वर्गासमोर मोठ्या संख्येत विद्यार्थीही होते. तेवढ्यात तेथे यामाहा मोटरसायकलवर दोन आरोपी आले. त्यांनी तेथे आरडाओरड केली. सदर गुंडांनी गदारोळ करत त्रिपाठी यांना शिवीगाळ करून त्यांनी ‘आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले दादा आहोत’, असे म्हणून आपल्या जवळचे पिस्तूल काढले ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दिशने रोखत पिस्तुलाचा चाप ओढला.

जबरी चोरी करणारे पुणे पोलिसांच्या जाळ्यात

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dcba03d0-ce25-11e8-a98b-5b2df6bed3e6′]
या  प्रकारमुळे घाबरून विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यानंतर आरोपी धमकी देऊन पळून गेले. त्रिपाठी यांनी प्रतापनगर ठाण्यात या घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. नंतर त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींनी घटनास्थळी हवेत एक गोळी झाडल्याची चर्चा होती. मात्र, परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी फायरिंगचा इन्कार केला. आरोपींनी पिस्तूल काढून केवळ धाक दाखवल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींच्या मोटरसायकलचा छडा लावला आहे. काही संशयितांना शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करत आहेत.