पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या युवकाने थेट खडक पोलिस ठाण्यात जखमी अवस्थेत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जखमी युवकास तात्काळ ससून रूग्णालयाकडे रवाना केले आहे. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी धाव घेतली आहे. दिवसा ढवळया पुण्यातील शुक्रवार पेठेत गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
रुपेश पाटिल (32, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. आरोपींनी चार गोळ्या झाडल्या आहेत.
ही घटना गर्दीच्या ठिकाणी झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोघांनी मंगेश धुमाळ याच्यावर गोळीबार केला तसेच त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले आहेत. गाेळीबार झाल्यानंतर जखमी झालेल्या मंगेशने जवळच असलेल्या खडक पोलिस ठाण्यात धाव घेतली. रक्ताने कपडे माखलेले होते. पोलिसांना देखील त्याला पाहुन काहीच सुचेनासे झाले होते.
खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि इतर अधिकार्यांनी जखमी झालेल्या रुपेश पाटिल याला तात्काळ ससून रूग्णालयाकडे रवाना केले. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. पुर्ववैमनस्यातून रुपेश पाटिल याच्यावर गोळीबार झाल्याची चर्चा आहे. मात्र, कोणी आणि कशासाठी गोळीबार केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. खडक पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत तर त्याच्या पायाला गोळी लागली आहे. कोयत्याने वार झाल्याने रुपेशच्या शरिरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. दिवसाढवळया गोळीबार झाल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.