दरवाजा कोयत्याने तोडून जीवे मारण्याची धमकी ; माजी नगरसेविकेसह १० ते १५ जणांची ‘दहशत’

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – शिंदे आळीत दोन गटात झालेल्या भांडणात गोळीबार व कोयत्याने वार करण्याचा प्रकार घडल्यानंतर माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी कोयत्याने घराचा दरवाजा तोडून घरात शिरुन धुमाळ कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी रुपाली पाटील, प्रियंका पाटील, रुपाली पाटील यांचा ड्रायव्हर, अनुजा पाटील व इतर १० ते १५ जणांविरुद्ध दंगल माजविण्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनिषा धुमाळ यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

३१ आॅक्टोंबर रोजी रुपाली पाटील यांचा भाऊ रुपेश पाटील व त्याच्या साथीदारांनी शिंदे आळीत दुपारी साडेतीनच्या दरम्यान मंगेश धुमाळ याच्यावर कोयत्याने वार करुन त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यात मंगेश याच्या पायात गोळी लागली होती. त्यानंतर धुमाळ याच्या साथीदारांनी रुपेश व इतरांना मारहाण केली होती. हे समजताच रुपाली पाटील, प्रियंका पाटील, अनुजा पाटील व इतर १० ते १५ जण मनिषा धुमाळ यांच्या घरावर चालून गेले. त्यांनी मनिषा धुमाळ व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करुन धुमाळ यांच्या घराचा दरवाजा कोयत्याने तोडला. त्यानंतर घरात शिरुन शिवीगाळ करीत मनिषा धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबियांना जीव मारण्याची धमकी दिली.

वडिलांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी केला खुन 

दीड वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर राजकीय कारणावरुन शुक्रवार पेठेत या दोन गटात अधून मधून भांडणे, वाद विवाद सुरु असतात. त्यातूनच ३० आॅक्टोंबर रोजी लहान मुलांच्या भांडणावरुन या दोन गटात पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला होता. त्यावेळी तो तात्पुरते मिटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगेश धुमाळ याच्यावर नयन मोहोळ याने गोळीबार करुन कोयत्याने वार केले होते. त्यात मंगेश गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले होते.

शुक्रवार पेठेतील शिंदे अळी परिसरात दोन गटांत कोयत्याने वार करून गोळीबार झाल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारींवरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्यानंतर खडक पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. तर  रुपेश पाटील यांचा साथीदार नयन मोहोळ याने गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

मंगेश धुमाळ (वय ३१) याच्यावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली होती. तर यावेळी मंगेश धुमाळसह गणेश दारवटकर, मंदार धुमाळ हे दोघे जखमी झाले होते. तर दुसºया गटातील  रुपेश पाटील, विशाल गुंड हे दोघे जखमी झाले होते.

याप्रकरणी मंदार धुमाळ याने दिलेल्या फियार्दीनुसार,रुपेश पाटील, नयन भाऊसाहेब मोहोळ, निखील मुुकुंद बाबर, शुभम गोरख बाबर, संग्राम खामकर, विशाल गुंड, लुकमान नदाफ यांच्यासह इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी लुकमान नदाफ याला पोलिसांनी अटक केली. तर रुपेश पाटील यांने दिलेल्या फिर्यादीनुसार मंदार दिलीप धुमाळ, गणेश सतीश दारवटकर, अभिजीत चंद्रकांत मोहिते, आकाश पुरुषोत्तम सापा या चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली असून मंगेश दिलीप धुमाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात रुपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, माझ्या भावाने गुन्हा दाखल केल्याने त्यांनी मी व माझ्या कुटुंबा विरुद्ध खोटी दाखल केली आहे. वास्तविक पाहता सदर घटनेवेळी मी एका वृत्तपत्र कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्तिथ होते सदर ची बाब ही न्यायालच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर न्यायालयाने मला कालच अटकपूर्व अर्ज मंजूर केला असे सांगितले.

संबंधीत बातम्या

पुण्यात भरदिवसा थरार….. युवकावर गोळीबार : युवक गंभीर जखमी 
भरदिवसा झालेल्या गोळीबाराने पुणे हादरले ; ६ तासानंतरही गोळीबाराचे गूढ गुलदस्त्यातच 
गोळीबार रुपेश पाटीलच्या साथीदाराने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न 

 

 

जाहिरात