प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचा अपघाती मृत्यू

मुंबई: पोलीसनामा आॅनलाईन
प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी मालाड येथे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. नितीन बाली ४७ वर्षांचे होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87c0137c-cbd3-11e8-81e9-356ff26038f2′]

नितीन बाली मंगळवारी सकाळी काही कामानिमीत्त बोरीवलीहून मालाडला जात असताना त्यांची गाडी दुभाजकाला धडकली. या अपघातात ते जखमी झाले. अपघातानंतर उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

[amazon_link asins=’B01M9C51T9,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9fd67579-cbd3-11e8-b964-677ea88c251a’]

घरी आल्यावर काही वेळाने त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. पोट दुखीचाही त्रास होऊ लागला. त्यांचा ब्लडप्रेशरही वाढला. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी नितीन बाली हे दारुच्या नशेत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
मुरबाडमध्ये टेम्पोच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यूनितीन बाली हे ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक होते. ते रिमिक्स गाण्यांसाठी ओळखले जात होते. छुकर मेरे मन को, एख अजनबी हसिना से, पल पल दिल के पास नीले नीले अंबर पे यांसारख्या अनेक गाण्यांचे त्यांनी रिमिक्स केले होते.