अर्बन हाट येथे श्रावण मेळ्याचे आयोजन

  • 2 ते 19 ऑगस्ट या कालावधीत देशभरातील कारागिरांची कला पाहण्याची संधी

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 1 ऑगस्ट 2018:

भारतीय संस्कृतीत श्रावण मास हा मांगल्याचा आणि सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण मासाचे औचित्य साधत सिडको अर्बन हाट येथे 2 ते 19 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत श्रावण मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • श्रावण मेळ्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पंजाब या राज्यांतील कलाकार/कारागीर सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध राज्यांतील कुशल कारागिरांनी निर्मिलेली हातमाग व हस्तकला उत्पादने या वेळी प्रदर्शनार्थ मांडली जातील. ज्यांना या कार्यक्रमासाठी स्टॉल बुक करायचे असतील त्यांनी अधिक माहितीसाठी व्यवस्थापक, अर्बन हाट यांच्याशी 9594521169 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

 

कलाकुसर केलेल्या उत्पादनांशिवाय या महोत्सवात दक्षिण भारतीय, राजस्थानी व कोल्हापुरी खाद्यपदार्थ, दिल्ली चाट यांचा आस्वादही घेता येईल. तसेच विविध प्रकारचे मसाले, पापड, लोणची विक्रीसाठी उपलब्ध असतील. धातू काम, लाकडावरील कोरीव काम आणि चामड्याची विविध उत्पादने हे या महोत्सवाचे आकर्षण ठरेल. श्रावण मेळ्याची रंजकता वाढविण्यासाठी महोत्सवाच्या कालावधीत दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 7 वाजल्यानंतर  सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

==================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ

================================================================================================================

  • गणपती स्पेशल गाड्यांचे तिकिट आरक्षण 2 ऑगस्टपासून
    https://goo.gl/Q6RGQ4