देशाने पुन्हा ऑक्सिजन मिळवला : करण जोहर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम ३७७ बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. दोन सज्ञान समलैंगिकांनी ठेवलेले संबंध ही पूर्णपणे खासगी बाब असून, तो गुन्हा ठरत नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला. या मोठ्या निर्णयानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच त्याचं स्वागत केलं आहे. यावर बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही ट्विटरवर आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एलजीबीटी कम्युनिटी ध्वजाचा फोटो पोस्ट करत त्याने आपलं मत ट्विटरवर व्यक्त केलं.

[amazon_link asins=’B07CNQRZBW,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’656209f7-b1b9-11e8-baba-b94f440a85c1′]

“ऐतिहासिक निकाल!! आज खूप अभिमान वाटतोय! समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेबाहेर करणं आणि कलम ३७७ रद्द करणं ही मानवता आणि समान हक्कांसाठी मोठी बाब आहे. देशाने पुन्हा ऑक्सिजन मिळवला”, असं ट्विट करण जोहरने केलं आहे.

अत्यंत कमी वयात बॉलिवूडमधील दिग्गज व यशस्वी दिग्दर्शकांच्या मांदियाळीत स्थान मिळवलेल्या करण जोहरने “दी अनसुटेबल बॉय’ हे आत्मचरित्रपर पुस्तकात समलैंगिकता या विषयावर भाष्य केलेले आहे.