‘दाल में कुछ काला है!, राफेलीची किंमत वाढली कशी ?’

कळंबोली : पोलीसनामा ऑनलाईन – २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या शौर्याचा फायदा राजकारणातील स्वार्थासाठी करून घेऊ नका, असे आवाहन शरद पवार यांनी केला आहे. तर राफेल प्रकरणावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ते कळंबोली येथील एका कार्यक्रामत बोलत होते.

बडगम येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला त्यात भारतीय हवाई दलाचे नाशिकचे जवान निनाद हे शहीद झाले. शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितलं. निनाद यांच्या पत्नीने मला सांगितलं की माझ्या नवऱ्याने देशासाठी प्राण गमावले. त्यांच्या मृत्यूचा बाजार करू नका असं सरकारला सांगा, असं पवार यांनी म्हटलं.

हे सरकार म्हणते ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’. मात्र काँग्रेसच्या काळात राफेल विमानाची खेरेदी किंमत ५२६ कोटी होती ती भाजपच्या काळात १६७० कोटीचे कसे झाले. ना खाऊंगा म्हणणाऱ्यांनी यावर स्पष्ट करावे. या क्या दाल में काला है, हे त्यांनी स्पष्ट करावे, असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.

दरम्यान, राजकारणातील चाणाक्य मानले जाणारे शरद पवार कधी कोणता डाव टाकतील कोणाच्या लक्षात येत नाही. मागील काही दिवसांपासून ते माढा लोकसभा मतदार संघातून लढणार होते, असं सांगितले जात होते. मात्र काल त्यांनी आपण माढ्यातूनल लोकसभा लढवणार नाही, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. त्यामुळे आता या निर्णयामागे शरद पवारांची नेमकी कोणती रणनिती आहे, हे सांगणे कठीण आहे.