नालासोपारा स्फोटकप्रकरणात घाटकोपरमधून आणखी एक अटकेत

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

नालासोपारा स्फोटक प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी रात्री घाटकोपरमधून ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04fd311c-a842-11e8-b8b1-6fbfa2dc2427′]

अविनाश पवार असं तरुणाचं नाव असून त्याला दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर यांना अटक करण्यात आली आहे.

या आरोपींनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याची माहिती पुढे आली. नालासोपारा येथे सापडलेले शस्त्रे आणि स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनविण्याचे धडे घेतल्याचेही चौकशीतून समोर आले आहे.
एटीएसच्या तपासात या प्रकरणात घाटकोपर येथील ३० वर्षांच्या तरुणाचा सहभाग असल्याचे समोर आले.

सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा तरुण कोण आहे, त्याचा गुन्ह्यातील नेमका सहभाग काय याचा तपशील अद्याप पोलिसांनी दिलेला नाही.