एक होता माळढोक...

By Admin | Published: April 29, 2016 11:26 PM2016-04-29T23:26:14+5:302016-04-29T23:26:14+5:30

सारंग’ कुळातील पक्ष्यांपैकी माळढोक किंवा मोठा भारतीय सारंग हा सर्वात आकर्षक आणि महत्त्वाचा पक्षी. सुमारे तीन फूट उंचीचा, 25 ते 30 पौंड वजनाचा व जमिनीवर

One was greener ... | एक होता माळढोक...

एक होता माळढोक...

googlenewsNext
>- डॉ. सुधाकर कु:हाडे
 
सारंग कुळातील माळढोक हा अत्यंत
आकर्षक आणि महत्त्वाचा पक्षी.
नगर, सोलापूर जिल्ह्यात या पक्ष्याचा
पूर्वी मुबलक वावर होता. 
त्यामुळे तिथे आशिया खंडातील सर्वात विस्तृत ‘माळढोक अभयारण्य’ आकाराला आले.
पण कालांतरानं हा पक्षीच जवळजवळ नामशेष झाला. 
इतका की गेल्या काही वर्षात नगरमध्ये एकही माळढोक 
नजरेस पडला नाही.
अलीकडल्या अधिसूचनेनुसार या अभयारण्याचे क्षेत्र आता तब्बल 
95 टक्क्यांनी घटवले आहे
 
सारंग’ कुळातील पक्ष्यांपैकी माळढोक किंवा मोठा भारतीय सारंग हा सर्वात आकर्षक आणि महत्त्वाचा पक्षी. सुमारे तीन फूट उंचीचा, 25 ते 30 पौंड वजनाचा व जमिनीवर राहणारा हा पक्षी. पायाला काटकोनात असलले आडवें शरीर ही त्याची महत्त्वाची ओळख. मान स्वच्छ पांढ:या रंगाची परंतु छातीवर चांदण्यांची काळी पट्टी. नराच्या डोक्यावर काळ्या पिसांचा तुरा, अंगावरील पिसे दाट बदामी रंगाची, त्यावर तुटक-तुटक काळ्या रेषा, पोट पांढुरके. नर आकाराने मादीपेक्षा मोठा. 
‘माळढोक’ म्हणजे माळरानाचे वैभव. गवताळ कुरणांचा हा राजा, म्हणूनच ‘काळवीट’ अन् ‘धाविक’ हे याचे सवंगडी. सर्व प्रकारच्या पिकांवर हल्ला करणारे ‘नाकतोडे’ अथवा ‘टोळ’ हे याचे मुख्य खाद्य. इ.स. 1809 ते 1829 या काळात एका ब्रिटिश शिका:याने अहमदनगरच्या भोवताली 961 माळढोक पक्ष्यांची शिकार केल्याची नोंद आहे. फरिद एच. बी. त्याबजी यांनी 1923 ते 1926 च्या दरम्यान बांबोरी ( परिसरात 200 ते 300 माळढोक स्वत: पाहिल्याची नोंद आहे. त्यांचे चुलतबंधू, ख्यातनाम पक्षी अभ्यासक जाफर फतेहअली यांनी याच परिसरात 1930 साली शेकडो माळढोक पाहिल्याचे लिहिले आहे.तत्पूर्वी इ.स. 1840 मध्ये मालेगाव (धुळे) परिसरातही 8क् ते 1क्क् माळढोक पक्ष्यांची नोंद ‘फ्रॅसर’ या अभ्यासकाने केलेली आहे. 
इ.स. 1961 ते 1963 दरम्यान वैजापूर (जि. औरंगाबाद) चे तत्कालीन बी.डी.ओ. कुलकर्णी यांनी या परिसरात किमान बारा वेळेस माळढोक पाहिल्याचे नोंदविले आहे. हा सर्व अभ्यास लक्षात घेऊन 1977 पासून अहमदनगर, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात माळढोकचा शास्त्रीय पद्धतीने शोध आणि अभ्यास सुरू झाला. त्यावेळेस हा पक्षी मिरजगाव आणि देऊळगाव (ता. कजर्त) परिसरात नेहमीच दिसून येई. याच काळात करमाळ्याच्या परिसरातही 8-10 माळढोकांची नोंद आहे. 1978-79 दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव, माही-जळगाव, कजर्त, देऊळगाव, बाभूळखेडा, जळका, मुक्तापूर, सलाबपूर या परिसरात माळढोकांचे वास्तव्य होते. 
 माळढोक पक्ष्यांची संख्या झपाटय़ाने कमी कमी होत आहे हे लक्षात घेऊन ‘माळढोक पक्षी अभयारण्याची’ अधिसूचना 27 सप्टेंबर 1979 रोजी काढण्यात आली, आणि या अभयारण्याचे क्षेत्रफळ 7818.47 चौरस किलोमीटर एवढे निश्चित करण्यात आले. या क्षेत्रमध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्य, रेहेकरी काळवीट अभयारण्य आणि नान्नज अभयारण्याचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय अनेक लहान-मोठी शहरे, शेकडो खेडी, रस्ते, रेल्वेमार्गाचे जाळे, पाणथळी, विमानतळाची जागा, शेतीचे हजारो हेक्टर क्षेत्र, लहान औद्योगिक वसाहती असे मोठे मानवी गरजांशी अन् विकासाशी निगडित असे क्षेत्र अभयारण्याखाली आल्याने सुरुवातीपासूनच या अभयारण्याला विरोध होणो साहजिकच होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात हजारोंच्या संख्येत असलेले माळढोक ब्रिटिश आणि स्थानिक शिका:यांचे बळी होत गेले. जीपसारख्या प्रभावी साधनांमुळे माळरानावर फिरून या पक्ष्यांची नानाविध कारणांसाठी शिकार होऊ लागली आणि माळढोकांची संख्या हळूहळू परंतु ठळकपणो कमी होत गेली.  माळढोक विणीच्या हंगामात एकच अंडे (वर्षातून एकदाच) देतो आणि हे अंडेही उघडय़ावरच (जमिनीवरच, झाडांच्या बुंध्यांच्या आसपास, नांगरटीमध्ये) असल्याने त्याला शत्रूही भरपूर असतात. शिकारी पक्षी, भटकी कुत्री, घोरपड हे प्राणी माळढोकचे अंडे खातात.  ही अंडी माळरानावर, शेतात, कुरणात चरणा:या गायी-म्हशी, बैलांसारख्या जनावरांच्या पायाखाली येऊन फुटतात आणि माळढोकच्या कुटुंबविस्ताराचा वेग मंदावतो.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कजर्त, श्रीगोंदा, पारनेर अन् जामखेड हे पारंपरिक दुष्काळी तालुके. स्वातंत्र्योत्तर काळातही काही दशके हा परिसर पाण्याशिवाय कोरडाच राहिला. अलीकडे तीस-चाळीस वर्षापासून या भागाचा पाणीप्रश्न हळूहळू कमी होत गेला.  गवताळ माळाचे रुपडे बदलत गेले अन् बांबोरीचा परिसर हिरव्याकंच ऊसशेतीने बहरून आला. माळराने लुप्त झाली. त्याऐवजी धरणांचे कालवे, चा:या यामधून पाणी वाहू लागले.
 हा दुष्काळग्रस्त जिल्हा सुजलाम्-सुफलाम् होऊन उसाची अन् सहकाराची मक्तेदारी असलेला जिल्हा म्हणून लौकिकास आला.
ख:या अर्थाने याच काळात म्हणजे 1970-80 च्या दशकात माळढोकांची संख्या रोडावण्यास सुरुवात झाली. अन् या समस्येची उकल म्हणून ज्या जिल्ह्यांमधे माळढोक मोठय़ा संख्येत दिसून यायचे त्या अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामधील क्षेत्रवर ‘माळढोक अभयारण्य’ उभे राहिले. 1978 च्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमधे मिरगाव, माही जळगाव क्षेत्रत नऊ पक्षी दिसल्याची नोंद आहे.औरंगाबाद-वैजापूर-गंगापूर परिसरातही याच काळात तीन-चार पक्ष्यांच्या नोंदी आहेत. सोलापूर जिल्ह्यात मात्र आठ-दहा माळढोक 1978-79 मधे वास्तव्यास होते. या आकडेवारीवरून करमाळा, सोलापूर वगळता अभयारण्याच्या इतर भागात माळढोकांची संख्या अत्यल्पच होती. माळढोक हा एकच ठिकाणी थांबणारा पक्षी नाही. तो स्थानिक स्थलांतर करतो म्हणूनच सलाबतपूर (ता. नेवासा, जि. अहमदनगर), भेंडाळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), शिरुर (ता. वैजापूर), निमगाव-छोबाव (ता. आष्टी, जि. बीड), चौसाळा (ता. जि. बीड), रुईभार, तुळजापूर, नळदुर्ग (सर्व ता. जि. उस्मानाबाद) या ठिकाणीही माळढोक दिसल्याच्या नोंदी आहेत. या नोंदी लक्षात घेऊन माळढोक अभयारण्याचे क्षेत्र वाढवून 1985 साली ते 8,496.44 चौरस किलोमीटर एवढे मोठे व्यापक करण्यात आले.
एकूणच क्षेत्रफळाचा, अभयारण्य म्हणून असलेल्या र्निबधांचा विचार करता यात असणा:या माळढोकांची संख्या अतिशय कमी होती. या दहा-पंधरा पक्ष्यांसाठी हजारो हेक्टर क्षेत्र राखीव का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. अभयारण्यामुळे आधीच दुष्काळी असलेल्या या परिसराचा विकास खुंटला आहे, अशी राजकीय टिका-टिप्पणीही अधून मधून ऐकू येत होती. वास्तविक पाहिलं तर यात वावगं असं काहीच नव्हतं.
जनसामान्यांचा अन् राजकीय विरोध लक्षात घेऊन मागील सरकारच्या काळात पहिल्यांदाच ‘माळढोक पक्षी गणनेचा’ फतवा निघाला आणि संपूर्ण वनविभाग कामाला लागला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये संपन्न झालेल्या आजवरील सर्व माळढोक गणनेमध्ये मी स्वत: सहभागी होतो. या पाच-सहा वर्षामधे आम्हाला नगर जिल्ह्यात एकही माळढोक दिसला नाही. या सर्व नोंदी शास्त्रोक्त पद्धतीने घेतल्यामुळे विश्वासार्ह होत्या. सोलापूर जिल्ह्यातही नान्नज वगळता इतरत्र माळढोक दिसला नाही.
या सर्व नोंदीचा फायदा घेत माळढोक अभयारण्याचे क्षेत्र कमी करण्याचे निश्चित होऊन ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ डॉ. विश्वास सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले. 
या समितीने सर्व गोष्टींचा विचार करून या अभयारण्याचे क्षेत्र 1229 चौरस किलोमीटर एवढेच ठेवण्यात यावे असे सुचविले.
मानवाच्या उत्क्रांतीपासूनच माणूस निसर्ग आणि वन्यजिवांविरुद्ध लढाई लढत आला असून, सदैव त्यात विजयी होत आला आहे. तथापि, बेसुमार वृक्षतोड, जागतिक तपमान वाढ, वाढते प्रदूषण, वारंवार पडणारा दुष्काळ, त्सुनामी, उत्तरांचलचा प्रलय, प्रलयकारी भूकंप, नगर-जुन्नरमधील बिबटय़ांचा वावर या घटनांमधून आपण काही शिकणार की नाही?
 
पूर्वीच्या आणि आताच्या अभयारण्य क्षेत्रमध्ये खासगी क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्यास होणारा विरोध कमी होत नव्हता. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे इतर वन्यजीव अभयारण्याप्रमाणो हे अभयारण्य एकसंध, सलग नव्हते. त्यामुळे जो भाग/परिसर संरक्षित नव्हता तेथे लहानमोठे उद्योगधंदे, रस्ते, पाण्याच्या चा:या, रहिवासी इमारती उभ्या राहिल्या. काही शेतांमधे उसाचे बारमाही पीकही डोलू लागले. अशा अडथळ्यांची शर्यत पार करीत ‘माळढोक’ आता स्वगृही परत येईल याची शाश्वती कमी झाल्याने राज्य सरकारने दि. 5 मार्च रोजी अधिसूचना काढून माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र फक्त 366 चौरस किलोमीटर ठेवले आहे.
 
(लेखक महाराष्ट्र शासनाचे 
मानद वन्यजीव रक्षक आहेत)
 

Web Title: One was greener ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.