औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील ज्युनिअर क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील ज्युनिअर क्लार्क गंगाधर नामदेव ढाळे (वय-३८) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ढाळे याने पोलीस खात्यातीलच एका शिपायाकडे लाचेचे मागणी केली होती. या कारवाईमुळे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B07B4S1GLV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f74089eb-b762-11e8-a375-c75897bfcdf4′]

याप्रकरणी ३५ वर्षीय पोलीस शिपायाने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी पोलिस आयुक्त यांचे नावे नविन घर घेण्यासाठी परवानगी मागितली होती. सदर परवानगी घेऊन देण्यासाठी  गंगाधर ढाळे याने लाचेची मागणी करून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे याची तक्रार केली. पथकाने पोलीस आयुक्तालयात सापळा रचून ढाळे याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बदनामीचा प्रयत्न – धनंजय मुंडे

ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोकराट यांच्या पथकाने केली.