राष्ट्रवादीच्या सभेत राडा ; शरद पवारांना गुंडाळावे लागले भाषण 

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे सातारा येथे आयोजित केलेल्या सभेत जोरदार गोंधळ झाला आहे. सभेत गोंधळ झाल्यामुळे शरद पवारांना अर्ध्यावरच आपले भाषण थांबवावे लागले. शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी मुळे हा गोंधळ झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा आढावा दौरा सुरु केला आहे. दरम्यान सातारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. या वादातून कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेत खाली बसले. सर्वांनी त्यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती केली, मात्र ते स्टेजवर न जाता खालीच बसले. यानंतर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी ‘सर्व सांगा, खरं सांगा’, असे म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली.

दत्तवाडी गोळीबार प्रकरण : निलेश घायवळ टोळीतील २६ जणांची निर्दोष मुक्तता 

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या समोरच या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. दोन्ही गटातील कार्यकर्ते ऐकायच्या मनस्थितीत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अर्ध्यावरच आपले भाषण थांबवावे लागले. या दोन गटातील वाद एवढा शिगेला पोहोचला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.