दौंड रेल्वे स्थानक, पंप हाऊस आणि जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ४ कोटी २२ लाख रुपये मंजूर

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन

दौंड येथील रेल्वे स्थानक, सोनवडी पंप हाऊस आणि डिफेन्स कॉलनी समोर जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वीत करण्यासाठी एकूण ४ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला हे यश आले असून लवकरच तीनही कामे मार्गी लागतील.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a624b54-ade6-11e8-912f-e92e77fdee38′]

दौंड रेल्वे स्थानकावर पादचाऱ्यांसाठी पूल बांधण्याची मागणी सुळे यांनी केली होती. त्यानुसार नवीन पादचारी पुलासाठी १ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी मंजुर झाला असून लवकरच काम याठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. याबरोबरच दौंड येथील सोनवडी पंप हाऊस साठी नवीन नळजोडणी आणि जॅकवेल दुरूस्तीसाठी १ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी समोर सुरू असलेले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी निधीची गरज होती. त्यासाठी सुद्धा सुप्रिया सुळे यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याला अपेक्षित यश आले असून ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून नागरिकांची पाण्याची गरज भागण्यास मोठी मदत होणार आहे.

दि.13 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधित 28 लाख 50 हजाराची व्हीव्हरशिप मिळवलेल्या Policenama News या चॅनेला Subscribe करा.

Policenama News