‘ति’च्या कारणावरून शिक्षकाने हटकले ; विद्यार्थ्यांनी शिक्षकाला बडविले

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – शुल्लक कारणातून विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत घडला. नागेश विद्यालयात शनिवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेचा विविध शिक्षक संघटनांनी निषेध केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जामखेड शहरातील नागेश विद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी शाळेचा वेळ वेगवेगळा आहे. सकाळच्या सत्रात मुलांची शाळा असून, दुपारी 12 वाजता मुलींची शाळा भरते. शनिवारी दुपारी बारा वाजता मुलांची शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थी हे विद्यार्थिनींच्या जवळून जाताना दिसले. त्या विद्यार्थ्यांना शिक्षक एस. डी. कांबळे यांनी त्यांना हटकले. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना राग आला. तो राग मनात धरून शिक्षक कांबळे हे स्टाफरूमकडे जात असताना दोन-तीन विद्यार्थ्याने क्षुल्लक कारणावरून त्यांच्याशी वाद घालता. दप्तराने कांबळे यांना मारहाण केली.

या दप्तरामध्ये लोखंडी हत्यारे असल्याचा संशय शिक्षकांनी मुख्याधापकांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. दरम्यान, विद्यालयातील शिक्षकांनी या घटनेचा निषेध करत विद्यालयाचे मुख्याध्यापकांना निवेदन देऊन या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुख्याध्यापकांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

शिक्षकांना विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना घडूनही मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप यांनी केला आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे.