पुणे : ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. कविता महाजन यांना काही दिवसांपासून न्यूमोनियाने ग्रासले होते. बाणेर येथील चेलाराम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ब्र’, ‘भिन्न’, ‘कुहू’ अशा अनेक गाजलेल्या कांदबरींचे लेखन त्यांनी केले. कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती.

पुरस्कार
2008 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार
2008 मध्ये कवयित्री बहिणाई पुरस्कार
2011 मध्ये साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी) 2013 मध्ये ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कार