लोकसभेसाठी पुण्यात भाजपही सक्रीय संयोजकपदी दीपक मिसाळ यांची निवड

ADV

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे संयोजक म्हणून माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ आणि सहसंयोजक म्हणून नगरसेवक दीपक पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a67c2fe1-aab1-11e8-8738-ab51fc7d3d04′]

ADV

लोकसभेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन मतदार नोंदणी, सोसायटीनिहाय मतदान केंद्रे, बूथ विस्तारक योजना, विस्तारकांना कार्यक्रम देणे, शासनाची विकासकामें आणि योजना मतदारांपर्यंत पोहोचविणे आदी कामांच्या संयोजन आणि समन्वयासाठी मिसाळ आणि पोटे यांची नियुक्ती केली आहे असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.

लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता : शरद पवार 

याखेरीज शासकीय योजना विभागाचे संयोजक म्हणून प्रा.विनायक आंबेकर आणि सहसंयोजक म्हणून राणी भोसले, प्रकाश मंत्री, अजय खेडेकर, सोशल मिडीया संयोजक म्हणून विनीत वाजपेयी आणि सहसंयोजक म्हणून निखील पंचभाई, कायदा आघाडीचे संयोजक म्हणून ईशानी जोशी आणि सहसंयोजक म्हणून अनिरुद्ध पायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे : माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन विद्रोही कवीला अटक