गनमॅन शैलेश जगताप यांच्या भावाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गनमॅन शैलेश जगताप यांच्या याचे भाऊ जितेंद्र जगताप (वय 53 रा घोरपडी पेठ) यांनी आज (शनिवार) घोरपडी परिसरात रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही घटना दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये काही व्यक्तींची नावे आहेत. याचा तपास करुन संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

जगताप यांनी रेल्वेगाडीखाली उडी मारुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग रेल्वे स्थानक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिली. जगताप यांनी शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येत असलेल्या मनमाड पँसेजर रेल्वेगाडीखाली उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय आधिकारी घोरपडे, पोलीस निरीक्षक खंडाळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

रेल्वेगाडीचालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत  जगताप यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.जगताप हे रास्ता पेठ भागातील सामाजिक कार्यकर्ते होते. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी  भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. पुणे पोलीस दलातील हवालदार शैलेश जगताप यांचे ते बंधू होत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.