Pulwama terror attack : ७ जण ताब्यात

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यात ४४ जवान शाहिद झाले आहेत. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे. पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून या सात जणांना ताब्यात घेण्यात आले.या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून या सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई पुलवामा आणि अवंतीपुरा या भागात करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी नमूद केले.
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असून आदिल अहमद दार याने ‘जैश’चा पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवला. काकापोरा येथील रहिवासी असून. स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.