बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चंद्रपूर | पोलीसनामा ऑनलाईन 
एका बालगृहातील अल्पवयीन निराधार मुलीवर काळजीवाहकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हा बालकल्याण समितीने चंद्रपूर शहरातील स्नेहदीप बालगृहाची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी बंडू कुत्तरमारे यास अटक करण्यात आली असून त्यास पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद : गणेशभक्तांच्या वाटेमध्ये वाहतूक कोंडी
बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षां जामदार यांच्या नेतृत्वात ५ ऑगस्ट २०१८ रोजी स्नेहदीप बालगृहाची तपासणी करण्यात आली. अ‍ॅड. जामदार, राजुराचे तहसीलदार डॉ. होळी, महिला आणि बालकल्याण अधिकारी, समाजसेवक यांच्या समितीच्या वतीने ही तपासणी झाली. या तपासणीत बालगृहातील अल्पवयीन मुलींना त्यांच्यासोबत शारीरिक शोषणासारखा प्रकार झाला काय, याबाबत विचारणा केली गेली. यावेळी  एका अल्पवयीन मुलीने बंडू कुत्तरमारे याने ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची माहिती दिली.  याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करून कुत्तरमारेला अटक करण्यात आली.
[amazon_link asins=’B07FH4PDHJ,B07DB85QZ3,B0756VRJ1X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd5d0d7e-b649-11e8-8f29-47fe078c5c9f’]
स्नेहदीप बालगृहातील इतरही मुलींवर बलात्कार झाला असावा अशी शंका समितीने बाल संरक्षण पथकाकडे सादर केलेल्या अहवालात व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. ही संस्था तात्काळ बंद करून तेथील मुलींना सिंदेवाही येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बाल गृहातील बलात्कार प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील बालगृहांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यातील तपासणीत हा प्रकार उघडकीस आला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ
या बालगृहात नऊ मुली आणि एक मुलगा आहे. ही घटना समोर येताच या संस्थेची मान्यता रद्द करून ती तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बलात्काराचे हे प्रकरण उघडकीस येताच इतर मुली घाबरल्या असून त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समजते. पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.