स्वस्त इंटरनेट पॅक बनतोय मानसिक आजाराचे कारण 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंटरनेट ही आता चैन राहिली नसून, काळाची गरज होऊन बसली आहे. इंटरनेट सातत्याने वापरणं एक व्यसन आहे. टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेमुळे गेल्या काही काळापासून इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मात्र या स्वस्त होत असलेल्या इंटरनेटच्या दरांमुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, इंटरनेटचा अतिरेकी वापर लोकांना मानसिक रोगी बनवत असल्याचा धोकादायक निष्कर्ष समोर आला आहे.
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5f68e49e-cc5b-11e8-9c3c-2fa3f6048933′]
दिवसाला दीड जीबी डेटा किंवा अनलिमिटेड डेटा स्वस्तात वापरायला मिळत असल्या कारणाने अनेक लोक विशेषतः तरुण मोठ्या प्रमाणावर आपल्या वेळ इंटरनेटवर व्यतीत करताना दिसत आहेत. इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे तरुणांच्या मेंदूवर परिणाम  होत आहे. त्यामुळे चिडचिडेपणा, राग, अस्वस्थता, एकटेपणा आणि विचारांवर नियंत्रण न राहणे असा समस्यांनी तरुणाईला ग्रासले आहे. देशातील दर चारजणांपैकी एक जण मानसिक दृष्ट्या आजारी आहे. तसेच मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्यांमध्ये १६ वर्षांपर्यंतच्या मुलांचे प्रमाणही चिंताजनक आहे. १६ वर्षांपर्यंतच्या मुलांपैकी १३ टक्के मुले मानसिक आजारांनी ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
एका राष्ट्रीय चाचणीनुसार, आजमितीला आपल्या देशात २५ कोटी जनता मोबाइल वापरते. त्यातल्या २५ टक्के व्यक्ती दिवसातले एक-दोन तास रोजच यामध्ये व्यतीत करतात. यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष असले, तरी तरुण मुलामुलींचं प्रमाण खूप जास्त आहे. सगळे धरबंध सोडून ते या मायाजालाच्या आभासी जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरफटले आहेत, की त्यांना या इंटरनेट, मोबाइल आणि तत्सम तंत्रज्ञानाचं व्यसनच लागलं आहे, असं मानायला हरकत नाही.
 [amazon_link asins=’B016EOZ7OO,B078PLRKHK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c97d4ae-cc5b-11e8-8dbc-27673d5b00ab’]
मानसिक रोगावर उपाय….
तंत्रज्ञान हे नेहमीच दुधारी तलवारीसारखं असतं. त्याचा वापर आयुष्य सुखकर करण्यासाठी होतो; पण त्याच्या अतिआहारी गेल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याची दशा तर होतेच; पण रोजच्या कामात आणि दिनक्रमात अडथळे येऊन जीवनाची एकूणच घडी विस्कटून जाते. व्हर्चुअल जगापासून दूर राहणे हा या मानसिक आजारांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
[amazon_link asins=’B07GB9Z17Z,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cdd86063-cc5b-11e8-bd20-2fb262d3c4bc’]
रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला नेले फरफटत
ठाणे : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षाचालकाकडे लायसन्स मागणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाचालकाणे फरफटत नेल्याची घटना घडली आहे. आशा गावांडे असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून नागरिकांनी या रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. महात्मा फुले चौक पोलिसांनी या मुजोर रिक्षाचालाकला ताब्यात घेतले आहे. नागेश अवालगिरी असे त्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिला पोलिस कर्मचारी आशा गावंडे या कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असून त्या सायंकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियोजनाचे काम करत असताना त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात नागेश अवालगिरी या रिक्षाचालकाकडे लायसन्स मागितले. मात्र नागेशने रिक्षा भरधाव वेगाने पुढे नेली. गावंडे यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने रिक्षा भरधाव वेगाने पुढे नेल्याने गवंडे रिक्षासोबत काही अंतरावर फरफटत गेल्या. नागेश याने रिक्षा न थांबवता तशीच पुढे नेल्याने रस्त्यावरील लोकांनी आरडाओरड करत नागेशला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत गावंडे या  जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी रिक्षाचालक नागेश याला ताब्यात घेतले आहे.