विमा कंपनीच्या संचालकांनी विम्याचे १७ लाख हडपले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

विमा कंपनीचे संचालक, अधिकारी यांनी विमा धारकाचे विम्याचे पैसे परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींनी विमा धारकाची १७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c34d7b18-c623-11e8-ac9b-2f9f74060264′]

याप्रकरणी एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचे संचालक, सीईओ अमिताभ चौधरी, विभा पडाळकर, संकेत मितल, सुरभी दिक्षीत यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cab4c665-c623-11e8-b751-bfece206c67b’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीची विमा पॉलिसी घेतली आहे. आरोपींनी फिर्यादी यांची  पॉलीसीचे फंड ट्रान्सफर फॉर्मवर फिर्य़ादीच्या सह्या घेतल्या. तुमच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर कर करण्याचे सांगून दिशाभूल केली. फिर्य़ादी यांची दिशाभूल करुन आरोपींनी १७ लाख रुपयांचा अपहार करुन त्यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्य़ादी यांनी खडकी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

[amazon_link asins=’B078124279,B0784D7NFX,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7c6b92e-c623-11e8-907f-c7fdb392a531′]

महापालिकेचा भूखंड तारण ठेवून घेतले ४५ कोटींचे कर्ज

अहमदाबाद : गुजरातमधील साबरमती नदीसमोरचा अहमदाबाद महानगरपालिकेचा मोठा भूखंड एका राष्ट्रीय बँकेकडे तारण ठेवून त्यावर ४५ कोटींचे कर्ज घेण्याचा प्रताप मुंबईतील एका इसमाने केला आहे. या प्रकरणात चमनलाल अवतनी, त्याची पत्नी वनिता अवतनी, रमेशचंद्र गुलाबनी आणि जयेश बांकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साबरमती नदीसमोर पालदी येथे अहमदाबाद महानगरपालिकेचा ६ हजार ३१५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. तो भूखंड सरकारी मालकीचा असल्याने कोणालाही विकला जाऊ शकत नाही. तसेच कोणाला हस्तांतरितही केला जाऊ शकत नाही. मात्र चमनलाल अवतनी याने कागदोपत्री घोटाळा करून तो भूखंड राजेंद्र माणेकलाल पटेल याच्या मालकीचा दाखवून पटेल याने तो आपल्याला दिल्याचे दस्तावेज तयार केले. नंतर त्याने तो भूखंड एका बडय़ा राष्ट्रीय बँकेकडे तारण ठेवून त्यावर २०१० सालात ४५ कोटींचे कर्ज घेतले