काँग्रेसची भूमिका शहाणपणाची : शरद पवार

वृत्तसंस्था :

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक ठरला. कर्नाटकचे दोन दिवसांचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर केवळ राजकीय क्षेत्रातच नाही तर सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. आता येडियुरप्पा यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. ” बहुमत नसतानाही भाजपने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री करायला नको होते” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही अमिषाला कर्नाटकातील आमदार बळी पडले नाहीत. कर्नाटकच्या राज्यपालांच्या भूमिकेविषयी शरद पवार यांन आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले.. राज्यपालांनी लोकशाहीला आघात करण्याच काम केल. संसदी लोकशाही पद्धतीवरही आघात केला आहे. कर्नाटकचे राज्यपाल राजीनामा देतील ही अपेक्षा आहे. तसेच राज्यपालांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा ठेवायला हवी होती अशा शब्दात शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

काँग्रेसने या लढाईत पहिल्या दिवसांपासून समंजस्याची भुमिका दाखवली. काँग्रेसची भूमिका शहाणपणाची असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस-जेडीयूच्या आमदरांचे अभिनंदन केले.

‘कर्नाटकात लोकशाहीचा विजय आणि धनशक्तीचा पराभव झाला. ही घटना देशाच्या राजकारणाला आगामी काळात नवे वळण देणारी ठरणार आहे. समान विचारांच्या पक्षांनी एका व्यासपीठावर येण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखीत झाली.’ असे ट्विट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केले आहे.