पवार साहेबांनी धनंजय मुंडेंच्या हातात नारळ द्यावा : सुरेश धस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष नेते या घटनात्मक पदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी तत्काळ या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. शरद पवार साहेब शेतकऱ्यांचे कैवारी म्हटले जातात, त्यामुळे तातडीने पवार साहेबांनी धनंजय मुंडे यांच्या हातात नारळ द्यावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
[amazon_link asins=’B00WUGBBGY,B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’65957b5e-b772-11e8-832c-8dbab9e1192a’]

दरम्यान, गृहमंत्र्यांच्या आदेशाने पोलिसांनी सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. यावरही सुरेश धस यांनी भाष्य केलं. ”काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असतानाच गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या गृहमंत्र्यांचा त्याच्याशी संबंध नाही. कोर्टाने एसआयटी नेमून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत,” असं सुरेश धस म्हणाले.

”गुन्हे दाखल झाल्याचं वाईट वाटतं तर शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका. जिल्हा बँकेचा ठेवीदार हा गोरगरीब आहे. हे पैसे न मिळाल्यामुळे अनेकांचे आई-वडील देवाघरी गेले, अनेकांच्या मुलामुलींचे लग्न मोडले. खोटं बोल पण रेटून बोल याचंही थोडं भान विरोधी पक्षाने ठेवलं पाहिजे,” असं सुरेश धस म्हणाले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी